
Navroz Mubarak Wishes: भारतातील पारशी समुदयातील लोकं आज, 16 ऑगस्ट दिवशी पारसी नववर्षाची (Parsi New Year) सुरूवात करत आहे. हा दिवस नवरोज (Navroz) म्हणून देखील ओळखला जातो. पतेतीच्या दिवशी पारशी समाज आपल्या चूकांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप व्यक्त करण्यासाठी तर नवरोझ हा पतेती नंतरचा दिवस पारशी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून आनंदात साजरा करण्याचा दिवस असतो. या दिवशी पारशी समाजातील मंडळी अग्यारी मध्ये जाऊन देवदेवतांसमोर नतमस्तक होतात. मग यंदा तुमच्या पारशी समजातील मित्रमंडळींना, प्रियजनांना नवरोझ मुबारक च्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, नवरोझ मुबारक मेसेजेस, Wishes, WhatsApp Status, GIFs, HD Images शेअर करून त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. (नक्की वाचा: पतेती आणि नवरोझ मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या पारशी नववर्षाचा पहिला आणि त्याच्या शुभेच्छा कशा दिल्या जातात?).
दरम्यान पतेती आणि नवरोझ हे दोन वेगळे दिवस आहेत. पारशी समाजाचं नवं वर्ष ही नव्या पारशी वर्षाची/ कॅलेंडरची सुरूवात असते. अग्यारी या त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन ते प्रार्थना करतात. एकमेकांना गळाभेट देत, नववर्षाच्या शुभेच्छा देतात. मित्रमैत्रिणींना भेटतात. या निमित्ताने दान करण्याची देखील पद्धत आहे.
नवरोज मुबारक





पारशी समाज हा पर्शिया म्हणजे आताच्या इराणमधून भारतात आला. पतेती हा फारशी धर्मीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी धार्मिक प्रथा व परंपरेनुसार पारशी समाज आपला हा सण साजरा करतात. अहुर मज्द ही या धर्म संप्रदायाची मुख्य देवता आहे. तिचं पूजन करण्याची प्रथा आहे. तर अवेस्ता हा पारशी धर्माचा ग्रंथ आहे.
भारतात पारशी समाज अगदीच अल्पसंख्यांक आहे पण त्यांच्या रूढी परंपरा, खाद्य संस्कृतीने आजही भारतात त्यांची विशेष ओळख आहे. भारताच्य जडणघडणीतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.