Parsi New Year 2020: पतेती आणि नवरोझ मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या पारशी नववर्षाचा पहिला आणि त्याच्या शुभेच्छा कशा दिल्या जातात?
Nowruz Mubarak | File Image

भारतामध्ये आज (15 ऑगस्ट) दिवशी पारशी समाजासाठी 'पतेती' (Pateti) चा दिवस आहे. तर उद्या 16 ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष साजरं करणार आहे. हा सण म्हणजेच पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ (Nowruz) म्हणूनदेखील ओळखला जातो. दरम्यान पतेती  हा नूतन वर्षाचा आधीचा दिवस असतो. हा सण म्हणून साजरा न करता पारशी समाजासाठी तो पश्चातापदर्शक प्रार्थनेसाठी असतो. दरम्यान पतेती दिवशी पारशी समुदयातील लोकं त्यांच्या चूका, वाईट गोष्टींबाबत क्षमा मागतात आणि दुसर्‍या दिवसापासून नवी सुरूवात करतात.

दरम्यान पारशी हा भारतातील अत्यंत लहान समुदाय आहे. शहेनशाही, फसली आणि कदिमी अशा तीन विभागात हा पारशी समुदाय विभागला आहे.  जाणून घ्या पतेती आणि पारशी नववर्षाबद्दल आणि त्याच्या सेलिब्रेशनबददल!

इराणमध्ये 21 मार्च दिवशी पारशी समाज नववर्षाचा पहिला दिवस साजरा करतो. साधारण उत्तर गोलार्धात 20, 21 मार्च दरम्यान विषुवदिन असतो. या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्याने दिवस आणि रात्र समान असते. त्यामुळे याच दिवसाचं औचित्य साधर हिजरी शमसी कॅलेंडरचं नवं वर्ष या मुहूर्तापासून सुरू होते. भारतामध्ये पारशी समाज शहेनशाही कॅलेंडर नुसार नववर्ष साजरं करते. त्यामध्ये लीप इयर मोजले जात नाही. त्यामुळे भारतात पारशी नववर्ष हे ऑगस्ट महिन्यात साजरे केले जाते. फरवर्दीन महिन्याचा पहिला दिवस हा पारसी नवनवर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

पतेती म्हणजे काय?

नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा करण्याचा असतो.

नवरोझ म्हणजे काय?

पारशी समाजाचं नवं वर्ष ही नव्या पारशी वर्षाची/ कॅलेंडरची सुरूवात असते. अग्यारी या त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन ते प्रार्थना करतात. एकमेकांना गळाभेट देत, नववर्षाच्या शुभेच्छा देतात. मित्रमैत्रिणींना भेटतात. या निमित्ताने दान करण्याची देखील पद्धत आहे. हा पारशी समाजासाठी मोठा उत्साहाचा दिवस असतो.

भारतामध्ये सुमारे 60,000 पारशी लोकं राहतात. पारशी लोकांचा धर्म झोरास्ट्रियन याचा संस्थापक झरतुष्ट्र आहे. तर अवेस्ता हा पारशी धर्मग्रंथ आहे. मग यंदा तुमच्या पारशी मित्रमैत्रिणींना पारसी नववर्षाच्या शुभेच्छा देताना 'पारशी नूतनवर्षाभिनंदन' किंवा हॅप्पी नवरोझ असं म्हणून त्यांचा नववर्षाचा आनंद तुम्ही द्विगुणित करू शकता.