Daughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट
National Daughters Day 2020 Quotes| File Image

Happy National Daughters Day 2020: भारतामध्ये सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा नॅशनल डॉटर डे (National Daughters Day) म्हणजेच राष्ट्रीय कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे यंदा देशात 27 सप्टेंबर दिवशी राष्ट्रीय कन्या दिवस (National Daughters Day 2020) म्हणून साजरा केला जाणार आहे. जगभरात नॅशनल डॉटर डे साजरा करण्याच्या वेगवेगळ्या तारखा आहेत. भारतामध्ये पितृप्रधान संस्कृती असल्याने मुलींकडे 'परक्याचं धन' म्हणून पाहिलं जातं. अनेक ठिकाणी आजही मुली 'नकोश्या' आहेत. समाजातील हाच विचार बदलण्यासाठी, मुलीचा जन्म स्वीकारण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. मुलांच्या बरोबरीने त्यांना समाजात, शिक्षणात, नोकरीमध्ये संधी मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. नॅशनल डॉटर डे म्हणजेच राष्ट्रीय कन्या दिवस साजरा करण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे समाजामधील मुलगा आणि मुलीला मिळणार्‍या दुय्यम वागणूकीला कमी करण्यासाठी आहे. त्यामुळे तुमच्या मुलीचा जन्म सेलिब्रेट करण्यासाठी, या जगात तिच्या अस्तित्त्वाला सेलिब्रेट करण्यासाठी आजचा नॅशनल डॉटर डे आहे मग तुमच्या आयुष्यात, नातलगांमध्ये मुलींच्या रूपाने सार्‍या जणींना व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook), ट्वीटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) याच्या माध्यमातून राष्ट्रीय कन्या दिवसाच्या  शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित करा.

मुलगी हा लिंग भेद आता कोणत्याच क्षेत्रात उरलेला नाही. मुलाच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना काही क्षेत्रामध्ये मुलांपेक्षा आता अनेक क्षेत्रात मुली अव्वल कामं करताना दिसत आहेत. मग आजचा दिवस तुमच्या मुलीसोबत साजरा करून त्यांना देखील या जगात त्या सुरक्षित आणि भरारी घेण्यासाठी पूर्ण सक्षम असल्याची जाणीव करून द्यायला हे काही खास विचार शेअर करायला विसरू नका. National Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास.

राष्ट्रीय कन्या दिन 2020 च्या शुभेच्छा

National Daughters Day 2020 Quotes| File Image

प्रत्येक आईसाठी तिची मुलगी दैवी खजिना असते - Catherine Pulsifer

National Daughters Day 2020 Quotes| File Image

तुमच्या मुलींचा आदर करा. कारण त्या आदरणीय आहेत - Malala Yousafzai

National Daughters Day 2020 Quotes| File Image

'लेक' ही निसर्गाने दिलेली एक अनमोल भेटवस्तू आहे - Laurel Atherton

National Daughters Day 2020 Quotes| File Image

We, Mothers, Are Learning to Mark Our Mothering Success by Our Daughters’ Lengthening Flight.” – Letty Cottin Pogrebin

 

National Daughters Day 2020 Quotes| File Image

“Courage, Sacrifice, Determination, Commitment, Toughness, Heart, Talent, Guts. That’s What Little Girls Are Made of.” – Bethany Hamilton

आजकाल व्हॉट्सअ‍ॅप हे अतिशय लोकप्रिय अ‍ॅप आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून शुभेच्छा पाठवण्याची सोय आहे. दरम्यान कस्टमाईज्ड देखील स्टिकर्स बनवता येऊ शकतात. त्यासाठी तुम्हांला काही मोडिफेशन करून अ‍ॅप्सच्या मदरीने स्टिकर्स बनवण्याची सोय आहे. गूगल प्ले स्टोअर वर त्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. पॅक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

भारतामध्ये चौथा रविवार डॉटर डे म्हणून साजरा केला जातो तर अमेरिकेमध्ये यंदा 25 सप्टेंबर दिवशी डॉटर डे साजरा झाला आहे. डॉटर डे सेलिब्रेट करण्याचे अनेक पर्याय आहेत. कुटुंबामध्ये या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही गेट टुगेदर करू शकता, तुमच्या मनातील भावना मोकळया करू शकता. त्यासाठी ग्रिटींग्स बनवू शकता. डॉटर डे रविवारी असल्याने तुमच्या घरात सार्‍यांनाच सुट्टी असेल तर एकत्र येऊन केक किंवा एखादा पदार्थ बनवू शकता. मग आम्हांला सांगा तुमचा यंदाचा डॉटर डे सेलिब्रेशनचा प्लॅन!