Dead Body | Pixabay.com

UP Shocker: मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका ने तिच्या दोन अल्पवयीन मुलींना विष पाजून स्वतः ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  विंती असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून महिलेने बुधवारी सायंकाळी सपना (१३) आणि सरस्वती (११) या मुलींना विष पाजले आणि नंतर आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. भोपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छचरौली गावात ही  धक्कादायक घटना घडली आहे. भोपा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय कुमार यांनी सांगितले की, तिघांना रुग्णालयात नेण्यात आले जिथे विनती आणि सपनाचा मृत्यू झाला तर सरस्वतीची प्रकृती चिंताजनक आहे. रिपोर्टनुसार, महिलेला पती  मिंटू चौधरी याचे  दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, ज्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत असत. 

मृतमहिलेचा पती जवळच असलेल्या छचरौली गावात डेअरी चालवतो. शेजाऱ्यांनी दोघांमधील वाद मिटवण्यासाठी  अनेकदा मध्यस्थी केली होती.  पोलीस वाजपेयी यांनी सांगितले की, घरगुती कलहातून महिलेने विष प्राशन केले आहे. पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय महिलेला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणाचाअधिक तपास सुरू आहे.