National Daughters Day 2020 Messages in Marathi: मुलगी झाली म्हणजे घरात लक्ष्मी आली, असे मानले जाते. मात्र, पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती अधिक प्रबळ असल्याने मुलीला समाजात दुय्यम स्थान होते. त्यामुळे स्त्री जन्म हा नकोसा वाटायचा किंवा मुलगी जन्माला आल्यावर फारसे कौतुक केले जात नसे. परंतु, कालांतराने चित्र बदलू लागले. मुलींना समान शिक्षण, वागणूक मिळू लागली. सर्वच क्षेत्रात स्त्रीयांनी स्वतःला सिद्ध केल्याने त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाच्या दृष्टीकोनही बदलला. आता बहुतांश ठिकाणी स्त्रीला समान आणि आदरयुक्त वागणूक दिली जाते. तसंच मुलगी झाल्याचा आनंदही साजरा केला जातो. मात्र हे चित्र दिसण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. यासाठी काही देशांनी Daughter's Day राष्ट्रीय स्तरावर स्वीकारून तो साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतात सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. यंदा कन्या दिवस 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.
मुली या खासचं असतात. परंतु, कन्या दिनानिमित्त अनेक पालक आपल्या मुलींना छानसं गिफ्ट देतात. तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवून सरप्राईज देतात. तिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करतात. तिला एखादा संदेश पाठवून तिच्याप्रती प्रेम व्यक्त करतात. तर तुमच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा संदेश पाठवण्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, wishes ग्रीटिंग्स (Greetings), एसएमएस (SMS), मेसेजेस (Messages) शेअर करुन तिचा दिवस स्पेशल करा. (राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास)
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या शुभेच्छा!
मुली म्हणजे भूतकाळातील गोड आठवणी,
वर्तमानातील आनंदी क्षण आणि
भविष्यातील आशा
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या शुभेच्छा!
माझा श्वास तू,
माझा जीव तू,
माझ्या जगण्याचा अर्थ तू
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तिच्या पंखांना बळ देऊया
तिचा आत्मसन्मान वाढवूया...
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या शुभेच्छा!
मुलगी भार नाही
जीवनाचा आधार आहे!
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
थोडेच दिवस घरात राहून
आयुष्यभराच्या आठवणींची
साठवण देतात मुली
राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
एकीकडे मुलीच्या जन्माचे सोहळे साजरे होत असताना आपल्याच देशात अनेक ठिकाणी स्त्रीभ्रुण हत्या देखील मोठ्या प्रमावर केली जाते. हे जेव्हा थांबेल तेव्हाच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा होईल आणि आपल्यालाही करता येईल. मुलगा-मुलगी असा भेद न करता दोघांकडेही व्यक्ती म्हणून पाहता आले तर मानवी जीवन सार्थकी लागेल.