
14 जानेवारी म्हणजे उत्तरायणाचा (Uttarayan) दिवस. महाराष्ट्रात 14 जानेवारी दिवशी मकर संक्रांत साजरी (Makar Sankranti) केली जाते. इंग्रजी कॅलेंडर नुसार, नव्या वर्षातला पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवशी तीळगूळ बनवून एकमेकांना देत 'तीळगूळ घ्या गोड गोड बोला' असा संदेश दिला जातो. दरम्यान महिला वर्गासाठी हा सण हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमामुळे नटण्यामुरडण्याचा असतो पण पुरूष वर्ग या दिवशी पतंगबाजीचा आनंद लुटतात. आकाशात विविध रंगांचे, आकाराचे पतंग उडत असतात. यंदा ओमिक्रॉन दहशतीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुन्हा वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता तुम्हांला बाहेर पाडून आप्तांना, मित्रमंडळींना भेटून मकरसंक्रांतीचा सण साजरा करता येणार नाही पण सोशल मीडीयामुळे आता जगभरातील तुमच्या सार्या प्रियजणांना तुम्ही मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा नक्कीच मराठमोळ्या शुभेच्छा, ग्रीटिंग्स, Messages, GIFs द्वारा अवघ्या एका क्लिक वर देऊ शकता.
मकर संक्रांतीचा सण नवदांमप्त्यांसाठी देखील खास असतो. या निमित्ताने नव्या नवरीचे आणि जावयाचे देखील कोड कौतुक केले जाते. हलव्यांच्या दागिनांनी त्यांना सजवलं जातं. तर लहान मुलांसाठी बोरन्हानच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिला मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत त्यांच्या सोयीने हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात. मग आनंदाच्या या सणाच्या शुभेच्छा तुमच्या प्रिय व्यक्तींपर्यंत पोहचवण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग्स तुम्ही नक्की वापरू शकता. हे देखील नक्की वाचा: Makar Sankranti 2022 Shubh Muhurat: मकर संक्रांतीच्या पूजा विधी साठी हा आहे शुभ मुहूर्त, शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास होणार लाभ .
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

तिळगूळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तीळाची ऊब लाभो
गूळाचा गोडवा लाभो
तुमच्या यशाचा पतंग
आकाशात असाच उंच उंच जावो
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
शुभ संक्रांत!

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
इंग्रजी कॅलेंडर नुसार 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी करण्यापूर्वी एक दिवस आधी भोगी तर दुसर्या दिवशी क्रिकांत साजरी केली जाते. आपली ग्रामीण संस्कृती भोगीच्या निमित्ताने आपल्याला ऋतूमानानुसार आवश्यक आहारातील पौष्टिक बदलांचे महत्त्व अधोरिखित करून देते. महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी खास बाजरीची भाकरी आणि भोगीच्या मिक्स भाजीचा आनंद घेतला जातो. तर मकर संक्रांतीला फुटाणे आणि तीळगूळ चाखले जातात. काही ठिकाणी या सणाच्या निमित्ताने तेलपोळी, गूळपोळी देखील केली जाते.