Makar Sankranti Haldi Kunku 2022 Dates: यंदा मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कधी पर्यंत करू शकाल? जाणून घ्या तारखा
Haldi Kunku | PC: commons.wikimedia

ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार नववर्ष उजाडलं की जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti). मकर संक्रांतीला तिळगूळासोबत महिला वर्गाला आकर्षण असतं ते त्याच्यासोबत येणार्‍या हळदी कुंकू (Haldi Kunku) कार्यक्रमाचं. मकर संक्रांती पासून रथसप्तमी (Ratha Saptami) पर्यंत दरवर्षी सवाष्ण महिला हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करतात. काही घरात लग्नानंतर पहिली पाच वर्ष किमान हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हमखास आयोजित केला जातो. सध्या कोविड परिस्थिती पाहता मोजक्याच लोकांमध्ये आणि सुरक्षित वातावरणामध्ये या सणाचं वाण लुटण्यात हित आहे. मग जाणून घ्या नेमकं कधी पर्यंत तुम्ही घरच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करू शकता. हे देखील नक्की वाचा: Latest Rangoli Designs For Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीसाठी रांगोळीच्या हटके डिझाईन .

यंदा  हळदी कुंकू कधी पर्यंत करू शकाल आयोजित? 

सर्वसाधारण पूर्वपार चालत आलेल्या परंपरेनुसार, हळदी कुंकवाचा कार्यक्रम 14 जानेवारी मकर संक्रांती या दिवसापासून रथसप्तमी पर्यंत आयोजित केला जातो. यंदा रथसप्तमी 7 फेब्रुवारी दिवशी आहे. त्यामुळे तुम्ही यंदा 14 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करू शकता.

लग्नानंतर पहिलेच हळदी कुंकू असेल तर सुने सोबतच जावयाचे देखील खास कोड कौतुक करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने काळे कपडे आणि हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा केला जातो.

एकमेकींना हळदी कुंकू लावणं म्हणजे समोरच्या सुवासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असते. वाण म्हणजेच भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो. म्हणूनच यादिवसात महिला एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावतात, तिळगुळ, फुटाणे आणि गोडाचा पदार्थ देतात. सोबत एखादी लहानशी भेटवस्तू देऊन आनंद वृद्धिंगत करतात.