Happy Janmasthami 2021: छप्पन भोग म्हणजे काय? गोकुळाष्टमी निमित्त कृष्णाला दाखवण्यात येणाऱ्या 56 पदार्थांबद्दल जाणून घ्या अधिक
Janmashtami Chappan Bhog (Photo Credits: File Image)

भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव हा कृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो तर त्याच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाला साजरा करण्याची पद्धत आहे. हा उत्सव दहिकाला उत्सव म्हणून देखील ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने वृंदावन, गोकूळ, मथुरा, द्वारका, जन्नाथपुरी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा 2021 मध्ये जन्माष्टमीचा सण 30 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. अष्टमी तिथी 29 ऑगस्ट रोजी रात्री 11.25 पासून सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी दुपारी 01.59 वाजता संपेल. (Krishna Janmashtami 2021 Fancy Dress Ideas: गोकुळाष्टमीच्या दिवशी मुलांना राधा-कृष्ण सारखे तयार करण्यासाठी या सोप्प्या वेशभूषा जरुर करुन पहा )

पूजा-पाठ दरम्यान करण्यात येणारा छप्पन प्रकारच्या पदार्थांचा भोग

जेथे श्री कृष्णाची जन्मोत्सव साजरी केली जाईल, तेथे भक्त आपला बहुतांश वेळ उपवासासह भजन-कीर्तनात घालवतात आणि रात्री बारा वाजता मोठ्या थाटामाटात आणि श्रद्धेने भगवान श्री कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात . बालकृष्णाची पूजा आणि आरती झाल्यानंतर प्रसादाचे वाटप केले जाते. काही ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला छप्पन प्रकारचे अन्न (छप्पन भोग) देण्याची प्रथा आहे.

एका आख्यायिकेनुसार असे मानले जाते की, गोलोकावासात श्रीकृष्ण राधाजींसह दिव्य कमळावर विराजमान आहेत. त्या कमळाला तीन थर असतात. पहिल्या थरामध्ये 8 पाकळ्या, दुसऱ्या मध्ये 16 आणि तिसऱ्या थरामध्ये 32 पाकळ्या आहेत. या प्रत्येक 56 पाकळ्यांवर श्रीकृष्ण माया ठेवून बसले आहेत. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आपल्या सख्यांसह समाधानी आहेत.

जाणून घेऊयात या 'छप्पन भोग' मध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असतो

श्री कृष्णाला दाखवण्यात येणाऱ्या छप्पन भोगात, त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ ज्यात लोणचे, फराळ, पेये, फळे आणि खीर आणि पुरी इत्यादींचा समावेश आहे. जन्माष्टमीला दिल्या जाणाऱ्या छप्पन भोगांबद्दल सांगायचे झाले तर असे म्हटले जाते की यामध्ये 16 प्रकारच्या नमकीन, 20 प्रकारच्या मिठाई आणि 20 प्रकारच्या सुकामेवा अर्पण करण्याची परंपरा आहे. पाहूयात ते पदार्थ कोणते.

  • रबडी
  • पालक भाजी
  • दही
  • खीर
  • भात
  • रसगुल्ला
  • डाळ
  • चटणी
  • कढी
  • मालपुआ
  • मुरंबा
  • शंकरपाळी
  • घेवर
  • चिला
  • जलेबी
  • पापड
  • दलिया
  • लाडू
  • तूप
  • मध
  • मोहनभोग
  • मठ्ठा
  • लस्सी
  • लोणी
  • मलाई
  • मूग डाळ का हलवा
  • खिचडी
  • पकोडे
  • वांगे
  • लौकी
  • नारळाची चटणी
  • पूरी
  • कचोरी
  • पोळी
  • बदाम दूध
  • नारळ पाणी
  • आंबा
  • केळी
  • शंकजवी
  • द्राक्षे
  • सफरचंद
  • मनुका
  • काजू
  • बदाम
  • मनुका
  • पिस्ता
  • टिक्की
  • तांदूळ मिष्टान्न
  • भुजिया
  • पुदिन्याची चटणी ..
  • सौफ
  • पान
  • सुपारी
  • इलायची

असे म्हटले जाते की. गोवर्धन पर्वत सलग 7 दिवस हातात धरल्याने भगवान श्रीकृष्ण अन्न आणि पाणी घेऊ शकत नव्हते. मग भगवान श्रीकृष्णाबद्दल आदर दाखवून यशोदा माता, सर्व ब्रजवासी सह, 7 दिवस आणि 8 प्रहारसाठी 56 प्रकारचे व्यंजन तयार केले आणि श्री कृष्णासमोर त्यांची सेवा केली. तेव्हापासून कृष्णा जन्मोत्सवानिमित्त भोगाच्या छप्पन प्रकारांची परंपरा निभावली जात आहे.