Happy Dhulivandan 2020 HD Images: जगाच्या पाठीवर भारताव्यतिरिक्त असा क्वचितच देश असेल जिथे प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण साजरा केला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे इथले सण-उत्सव हे प्रामुख्याने शेतीशी निगडीत असतात. आता मार्च महिन्यात देशात होळी (Holi), धुलीवंदन (Dhulivandan) आणि रंगपंचमीचा (Rang Panchami) सण रंगणार आहे. महाराष्ट्रात फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा धुळवड व पुढे पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होलिका, ढुंढा, पुतना यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे होळीचा उल्लेख आढळतो.
होळीच्या दुसर्या दिवशी उरलेल्या निखार्यांवर दूध, दही घालून शांत करतात व होलिकेचे भस्म कपाळाला लावतात. यादिवशी होळीची राख एकमेकांना लावण्याची पद्धत आहे. काही भागात धुलीवंदनाच्या दिवशीच रंगही खेळला जातो. या तीनही दिवशी लोक एकत्र येतात, आयुष्यातील दुःख काही काळ बाजूला ठेऊन चार आनंदाचे क्षण व्यतीत करतात. तर अशा या धुलीवंदनाच्या दिवशी काही HD Greetings, Wallpapers, Wishes, Images च्या माध्यमातून आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना शुभेच्छा द्या आणि जोमात साजरी करा धुळवड.
दरम्यान, महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे, गोवऱ्या, पालापाचोळा मंत्रोच्चारात जाळण्यात येतात. पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. आपल्या आजूबाजूच्या वाईट शक्ती, मनातील राग-द्वेष, नकारात्मक विचार हे होळीत जाळून खाक व्हावे हा होळीचा उद्देश आहे. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते ते धुलीवंदन. (हेही वाचा: होळीचे रंग त्वचा आणि केसांमधून काढण्यासाठी 'या' घरगुती पद्धतींचा करा वापर, जाणून घ्या Home Remedies)
कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. धुलीवंदनाच्या दिवशी वसंतऋतुची सुरवात होते व शिशिरात पानझड झालेल्या झाडांना वसंतऋतुत नवी पालवी फुटते, या कारणामुळेही हा दिवस महत्वाचा आहे.