Holi Special Skin & Hair Care Tips (Photo Credits: Facebook)

बुरा ना मानो होली है! असे म्हणत तुम्हाला कोणी रंग लावायला आले असता चेहरा, त्वचा, केस खराब होतील याचा विचार करून तुम्हीही त्या व्यक्तीला अडवता का? स्वतःची इच्छा असूनही फक्त त्वचेची काळजी तुम्हाला आनंद साजरा करण्यापासून थांबवतेय का? तर असे करण्याची काहीच गरज नाही, आज आपण अशा काही खास टिप्स पाहणार आहोत ज्याचा वापर करुन तुम्हाला अगदी घरच्या घरी विनात्रास तुमच्या चेहऱ्याला, अंगाला, केसांना लागलेला होळीचा रंग (Holi Colours) काढून टाकता येईल.अलीकडे बाजारात आलेल्या कृत्रिम आणि पक्क्या रंगामुळे त्वचेची हानी होईल ही भीती असते, बऱ्याचदा तर हे रंग इतके केमिकल युक्त असतात की त्यांना दहादा रगडून काढले तरी त्वचेवर डाग उरतात व केसांमध्ये रुक्षपणा येतो. अशा वेळी काय करावे हे आता आपण पाहणार आहोत..

उद्या म्हणजेच 10 मार्च पासून धुळवडीला सुरुवात होत आहे त्यापुढील चार दिवस आणि मग रंगपंचमी असा हा फुल्ल पॅक धमाल आठवडा आजच्या होळी दहनापासून सुरु होईल. यावेळी कोणतीही चिंता तुम्हाला रोखून धरू नये यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत या हेल्थ केअर टिप्स.. चला तर मग जाणून घेऊयात. Dhulivandan 2020 Messages: धुलिवंदनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रीटिंग्स, Wishes, SMS, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा रंगोत्सव!

चेहऱ्यावरून होळीचे रंग कसे काढावेत?

-अगदी पक्क्या रंगाचा वापर केला असेल तर थेट पाणी लावण्याआधी खोबरेल तेलाचा वापर करून चेहरा स्वच्छ करा.

- गुलाल किंवा कोरडे रंग लागले असतील, तर केवळ पाण्याने धुवून काढा आणि मगच साबण किंवा अन्य प्रसाधनांचा वापर करा.

- रंग काढून झाल्यावर चेहऱ्याला मुलतानी मातीचा फेस पॅक लावा, ज्यामुळे त्वचेचे आत शिरलेले रंगाचे कण सुद्धा निघून जातील.

- चारकोल पील ऑफ किंवा तुमच्या त्वचेच्या पोतानुसार फेसपॅकचा वापर करू शकता.

-जोरजोरात चेहरा घासणे टाळा.

- लिंबू किंवा टोमॅटो चा रस लावून थोडा वेळ चेहरा सुकू द्या, अगदी गरम किंवा गाडीचं थंड पाण्याने चेहरा धुवू नका त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.

केसातून होळीचा रंग कसा काढावा?

- केसांवर शाम्पू लावण्याआधी कोमट पाण्याने भिजवून शक्य तितका रंग काढून टाका.

-भिजवलेले मेथीचे दाणे आणि दह्याचा हेअर पॅक किंवा अंड्याचा केवळ पिवळा भाग केसांना लावून अर्धा तासानंतर केस माईल्ड शॅम्पूने धुवा.

-डीप कंडीशनींग साठी मध आणि ऑलिव्ह ऑईल केसांना लावून आंघोळ करा.

होळीचा रंग काढताना चिंता करायची नसेल तर होळी खेळायला जाण्यापूर्वीच शरीराची योग्य ती काळजी घ्या, यासाठी त्वचा, चेहरा जास्तीत जास्त हायड्रेटेड असेल असे निश्चित करून घ्या, दरम्यान, यंदा आजारांचे सावट सुद्धा होळीवर असल्याने जास्त वेळ पाण्यात राहू नका. तुम्हाला सर्वांना होळी आणि रंगपंचमी सुरक्षित आणि आनंदात साजरी करता यावी यासाठी शुभेच्छा!