Dhulivandan 2020 Marathi Messages: धुलिवंदन हा एक रंगाचा उत्सव असून होळीच्या दुसऱ्या दिवसी साजरा केला जातो. त्याला धुळवड असे ही म्हटले जाते. तसेच परंपरेप्रमाणे या दिवसी होळीची राख एकमेकांना लावून धूलिवंदनचा आनंद व्यक्त केला जातो. होळीचे भस्म लावणे व आंब्याचा मोहोर खाणे, हे या उत्सवातील धार्मिक विधी आहेत. तर फाल्गुन कृष्ण पंचमी दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. मात्र मुंबई,पुणे सारख्या मेट्रो पॉलिटन शहरात धुलिवंदनाचा दिवस हा रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. मात्र ग्रामीण भागात अजूनही पारंपारिक पद्धतीने होळीचा सण पाच दिवस साजरा करण्याची पद्धत आहे.
पृथ्वी, आप, त्वज, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे. पृथ्वी पासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन. यादिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. तर यंदाच्या धूलिवंदनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा रंगोत्सव!(Holi 2020: महिलेने पुरुषाला लाठी चा मार देण्याची मुभा देते 'लट्ठमार होली'; बरसाने मधील या अनोख्या परंपरेविषयी जाणून घ्या)
>>रंगात रंग मिसळले की
आणखी छटा निर्माण होतात
माणसांनी माणसान भिडल की
छान नाती तयार होतात
चला रंग आणि नाती
अधिक काळ टिकवण्यासाठी
धूलिवंदन साजरी करुया...
>>होळी पेटू दे,
रंग उधळू दे,
द्वेष जळू दे,
अवघ्या जीवनात
नव रंग भरु दे!
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
>>दर दिवशी आयुष्यात नवनवीन रंग उधळणाऱ्या प्रत्येकाला धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
>>भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
>>उधळूया रंग आनंदाचे
जपूया रंग माणुसकीचे
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते. होळी चा हा सण पाहण्यासाठी लोक वज्र, वृंदावन, गोकुळ अश्या ठिकाणी जातात. आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते. वज्र ला होळी च्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. हि उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे.