
बौद्ध धर्मीय वैशाख पौर्णिमा हा दिवस बुद्ध पौर्णिमा ( Buddha Purnima) म्हणून साजरी करतात. यंदा हा दिवस 5 मे दिवशी साजरा केला जाणार आहे. गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही गोष्टी या एकाच दिवशी झाल्याची धारणा असल्याने बौद्ध धर्मियांकरिता हा दिवस खास असतो. जगभरामध्ये बौद्ध धर्मीय या दिवशी गौतम बुद्ध यांच्याप्रति आपली आदरांजली अर्पण करतात. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी प्रयत्न करतात. दरम्यान तुम्ही देखील या निमित्त प्रियजनांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Greetings द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
भारतामध्ये बुद्ध पौर्णिमेदिवशी सार्वजनिक सुट्टी असते. त्यामुळे या दिवसाच्या निमित्त बौद्ध धर्मीय एकत्र येऊन त्यांच्या विचारांप्रति आदरांजली अर्पण करतात. त्यांची शिकवण अंगी बाणण्यासाठी प्रयत्न करतात. नक्की वाचा: Buddha Purnima 2023 Date: बुद्ध पौर्णिमेची तारीख आणि संपूर्ण पूजा विधी, जाणून घ्या.
बुद्ध जयंती शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमा या मंगलमय दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा! हा खास दिवस
तुमच्या आयुष्यात सुख, शांती घेऊन येवो
हीच कामना!

नमो बुद्धाय
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते..
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्लीत साजरी करण्यात आली होती. त्यावेळी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले होते. बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी आता बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. घराघरात बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन केले जाते.