Buddha Purnima 2023 Date: बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी म्हणून साजरी केली जाते, भगवान गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जाते. जगभरात बुद्ध पौर्णिमा हा सण देशातील आणि जगभरातील बौद्धांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा प्रसंग आहे, ज्याला "बुद्ध जयंती" असेही म्हणतात. बुद्ध जयंती हा पूर्व आशिया आणि दक्षिण आशियामध्ये बौद्ध धर्माचे संस्थापक राजकुमार सिद्धार्थ गौतम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या वर्षी गौतम बुद्धांची २५८५ वी जयंती आहे. बुद्धाच्या जन्म आणि मृत्यूच्या अचूक तारखा अज्ञात असताना, इतिहासकारांचा अंदाज आहे की, त्यांचा जन्म आणि मृत्यू 563-483 बीसी दरम्यान झाला असावा.
बुद्ध पौर्णिमेची तारीख, वेळ
बुद्ध जयंती 5 मे रोजी साजरी केली जाईल, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहणही आहे. द्रिक पंचांग नुसार, पौर्णिमा तिथी 05 मे 2023 रोजी पहाटे 04:14 वाजता सुरू होईल आणि 06 मे 2023 रोजी पहाटे 03:33 वाजता समाप्त होईल.
बुद्ध पौर्णिमा साजरा करण्याची विधी
उठल्यावर घर स्वच्छ करावे. स्नान करून घरात गंगाजल शिंपडावे. घरात बुद्धाच्या मूर्ती समोर एक मेणबत्ती लावा आणि आपले घर फुलांनी सजवा. प्रवेशद्वारासमोर सुंदर रांगोळी काढा. याव्यतिरिक्त, करुणा आणि दयाळूपणाची भावना मनी बाळगून गरज असलेल्यांना अन्न आणि कपडे दान करण्याचा प्रयत्न नक्की करा.