हिंदू धर्मीयांसाठी खास असलेला आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक अशा अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) सण यंदा 14 मे दिवशी आहे. वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. महाराष्ट्रात लोकांची अशी धारणा आहे की या दिवशी त्रेतायुगाची सुरूवात झाली. तर उत्तर भारतामध्ये या दिवसापासून सत्ययुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. मग या मंगल पर्वाच्या दिवशी तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सोशल मीडीयात फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), व्हॉट्सअॅप स्टिकर्स (WhatsApp Stickers), स्टेटस (WhatsApp Status) यांच्या माध्यमातून अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे संदेश देऊन हा दिवस साजरा करा. सध्या भारतामध्ये कोरोना संकट अजूनही घोंघावत असल्याने आपण बाहेर पडून पूर्वीप्रमाणे जल्लोषात आनंद साजरा करू शकत नसलो तरीही या दिवसाची गोडी आपण घरीच सुरक्षित राहून आणि व्हर्च्युअल माध्यमातून अक्षय्य तृतीया साजरी करून नक्कीच वाढवू शकतो. Akshay Tritiya 2021 Rangoli Designs: अक्षय तृतीया च्या दिवशी काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन.
भारतामध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सणामधूनही ही वृत्ती जोपासण्यासाठी आजचा अक्षय्य तृतीयेचा दिवस विशेष आहे. मान्यतांनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केल्याने ते अक्षय आणि पुण्यकारक होते. आज कोविड 19 मुळे वातावरणामध्ये पसरलेली नकारात्मकता कमी करण्यासाठी अनेक गरजवंतांना आज लहान-सहान मदतीची गरज आहे. मग या पावन दिवसाची दिवसात थोडा आनंद HD Images, Wishes, Messages, Greetings द्वारा शेअर करून करायला काय हरकत आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा
अक्षय्य तृतीयेच्या दिनी
तुमच्यावर होवो धनाची बरसात
लक्ष्मी करो सदैव वास
संकटाचा होवो नाश
आणि ध्येयपूर्तींची धरा कास
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय्य तृतीयेला
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
अक्षय धनाचा कायम साठा होवो
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा
महाराष्ट्रात अक्षय्य तृतीयेपासून अनेक शेतकरी पुन्हा शेतीच्या कामाला सुरूवात करतात. काही जण या साडेतीन मुहूर्ताचं निमित्त साधत सोनं खरेदी करतात. अक्षय्य म्हणजे न संपणारे त्यामुळे या दिवशी तुम्ही दिलेले दान न संपणारे आहे असे समजून अनेकजण पाणी वाटप, अन्नछत्रात अन्न वाटप किंवा समाजपयोगी वस्तूंचं वाटप करून हा दिवस साजरा करतात.