अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक महत्वाचा दिवस आहे. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.या दिवशी दान-पुण्य करण्याचे विशेष महत्त्व आहे.अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विवाह, गृह प्रवेश, धार्मिक विधी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असा विश्वास आहे की या दिवशी सोने खरेदी केल्याने प्रगती होते. यंदा अक्षय तृतीया 14 मे 2021 रोजी आहे. आपल्याकडे दिवस असेल तेव्हा दारासमोर, देव्हाऱ्यासमोर , अंगणात रांगोळी काढली जाते. रांगोळी काढणे शुभ मानले जाते. हिंदू सणांच्या वेळी रांगोळी आवर्जून काढली जाते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही ही दारासमोर रांगोळी काढणारच असाल. पण वेळेला कोणती रांगोळी काढायची हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका.कारण आज आम्ही घेऊन आलो आहोत खास अक्षय तृतीयेला काढता येतील अशा रांगोळी डिझाईन. (Akshay Tritiya 2021: अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर खरेदी करा सोनं; जाणून घ्या सविस्तर )
अक्षय तृतीया स्पेशल रांगोळी
बांगडी च्या सहाय्याने काढलेले रांगोळी डिझाइन
फेविकॉल बॉटल च्या सहाय्याने काढलेली रांगोळी डिझाइन
अक्षय तृतीया कलश रांगोळी
पोस्टर रांगोळी
अक्षय तृतीया च्या दिवशी एखाद्या नवीन कामाला आरंभकरायचा असल्यास तो या यादिवशी करतात. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फल मिळते. विष्णू पार्वतीचे स्वामित्व असलेली ही तिथी आहे. या दिवशी केलेल देवपूजेमुळे घराण्यातील अनेक दोष नष्ट होतात.