Akshaya Tritiya (Photo Credits: Wikimedia Commons)

Akshay Tritiya 2021: वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. अक्षय या शब्दाचा अर्थ कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात. तसेच या दिवसापासूनचं त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. हा वर्षाचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. त्याचे अतुलनीय महत्त्व हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. म्हणूनचं बहुतेक हिंदू लोक या दिवशी सोने खरेदी करतात. आपणसुद्धा या दिवशी सोने विकत घेण्याचा विचार करत असल्यास प्रथम सोने खरेदीसाठी कोणता शुभ काळ आहे ते जाणून घ्या. जेणेकरून आपले सोन्याचे भांडार अक्षय राहील.

या दिवशी प्रत्येक हिंदू घरात आपल्या कुवतीनुसार, सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोन्याची खरेदी केल्याने भविष्यात आनंद आणि शांती तसेच समृद्धी येते. परंतु यावेळी कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे बाजारात जाऊन सोने खरेदी करणे शक्य नाही. तथापि, तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सोनं खरेदी करू शकता. (वाचा -When is Ramzan Eid 2021: यंदा रमजान ईद कधी? जाणून घ्या त्याचे महत्व)

अक्षय तृतीया शुभ मुहूर्त: (14 मे 2021, दिवस शुक्रवार)

पूजा चा शुभ मुहूर्त- सकाळी 05.38 ते दुपारी 12:18 वाजेपर्यंत

(एकूण वेळ 6 तास 40 मिनिटे)

तृतीया प्रारंभः सकाळी 05.38 पासून (14 मे 2021)

तृतीया समाप्ती - सकाळी 07.59 पर्यंत (15 मे 2021)

सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त -

सोनं खरेदी करण्याची वेळ - सकाळी 05.38 पासून (14 मे, शुक्रवार, 2021) ते सकाळी 05.30 वाजेपर्यंत (15 मे, शनिवार 2021)

(एकूण काळावधी: 23 तास 52 मिनिटे)

अमृत चौघड़िया मुहूर्त

पहाटेचा मुहूर्तः (चर, लाभ, अमृता): 05.38 पासून 10.36 पर्यंत

दुपारचा मुहूर्त (चर): 17.23 ते 19.04 पर्यंत

दुपारचा मुहूर्त (शुभ): 12.18 ते 13.59 पर्यंत

रात्रीता मुहूर्त (लाभ): 21.41 ते 22:59 पर्यंत

रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृता, चर): 00.17 ते 04.12, (15 मे, शनिवार, 2021)

अशा प्रकारे तुम्ही वरील वेळेनुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करू शकता. सोनं खरेदीशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन जागा, संस्था, मंडळे यांची स्थापना, उद्‌घाटन तसेच नवीन वाहन खरेदी करण्याचीही प्रथा आहे.