Gold-Silver Rates | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Madhya Pradesh Crime: रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी केली आहे. त्यात इंदौर येथील दोन महिलेने सोन्याच्या दुकानातून ग्राहक महिलेचा सोन्याचा हार चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ग्राहकाने या प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोघींवर गुन्हा दाखल केला. (हेही वाचा-  तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने पत्रकाराला भोकसले, तिघांवर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, जूनी इंदौर परिसरात  असलेल्या एका सराफाच्या दुकानात ही घटना घडली. मयुरी सेन असं ग्राहकाचे नाव आहे. मयुरीने सांगितले की, तिच्या पर्समधील सोन्याची चैन चोरली. गर्दी फायदा घेत दोन महिलांनी चोरी केली. चोरीच्या घटनेनंतर महिलेने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होती. त्यामुळे पोलिस सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्याप्रमाणे, मयुरी आणि तिची मुलगी सराफाच्या दुकानदाराशी बोलत होते. दरम्यान त्यांच्या मागे बसलेल्या दोन महिलांनी सावधपणे बॅग कापून सोन्याचा हार चोरून नेला. पर्सला फाडण्यासाठी महिलेने आधी तोंडातून ब्लेड काढले आणि पर्स फाडला. त्यानंतर हार पर्समधून काढला आणि स्वत:च्या बॅगेत टाकला. चोरीच्या घटनेनंतर दुकानात एकच गोंधळ निर्माण झाला. सराफआ पोलिस ठाण्याचे प्रभारी दीपक सिंह यादव यांनी सांगितले की, या महिलांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहे.