Guru Purnima 2021 Importance: शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेची तारीख खूपच पुण्यवान मानली गेली आहे, परंतु आषाढ महिन्याच्या पौर्णिमेचे महत्त्व अधिक आहे. ही गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी महर्षि द्वैपायन व्यास यांचा जन्म झाल्याचे मानले जाते. त्यांना वेद व्यास म्हणून देखील ओळखले जाते.गुरु वेद व्यासांनी पहिल्यांदाच मानवजातीला चारही वेदांचे ज्ञान दिले असल्यामुळे त्यांना प्रथम गुरू मानले जाते आणि आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पूर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणतात. यावेळी गुरु पौर्णिमेचा सण 23 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. गुरु पौर्णिमेशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊयात.
असे म्हटले जाते की, वेद व्यास यांनीच सनातन धर्माचे चार वेद स्पष्ट केले. या व्यतिरिक्त त्यांना श्रीमद् भागवत, महाभारत, ब्रह्मसूत्र, मीमांसा व्यतिरिक्त 18 पुराणांचे लेखक मानले जाते आणि त्यांना आदिगुरूंच्या नावाने संबोधले जाते. धर्मग्रंथात भगवंतांपेक्षा गुरुच्या स्थानास उच्च स्थान देण्यात आले आहे, म्हणून गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूची विशेष उपासना करण्याचा नियम आहे. (Bail Pola 2021: यंदा महाराष्ट्रात बैलपोळा आणि बेंदूर कधी ? जाणून घ्या महत्व)
गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त
पौर्णिमा तिथी प्रारंभ - 23 जुलै रोजी सकाळी 10:43 वाजता
पौर्णिमा तिथी समाप्ति - 24 जुलै, सकाळी 08:06 वाजता
अशी करा गुरु पौर्णिमा पूजा विधी
*सकाळी लवकर उठा आणि घर साफ करा.
*स्नान करून सर्व कामे आटोपून घ्या.
*एखाद्या पवित्र ठिकाणी पाटावर सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्वात्तर (पूर्व-पश्चिम) किंवा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) गंधाने बारा-बारा रेघा ओढून व्यासपीठ तयार करा.
*त्यापूर्वी 'गुरूपरंपरासिद्धयर्थ व्यासपुजा करिष्ये' मंत्र जप करा.नंतर दहाही दिशांना अक्षता टाका.
*आता ब्रम्हा, व्यास, शुकदेव, गोविंद स्वामी आणि शकराचार्यांच्या नावाने मंत्र पूजा करा.
*नंतर आपले गुरू किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या.
आयुष्यात विविध टप्प्यांवर येणाऱ्या गुरुंना वंदन करण्याचा, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.