Guru Purnima Marathi Wishes (Photo Credits-File Image)

Guru Pornima 2019 Marathi Wishes: आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून म्हटले जाते.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली. यंदा ही गुरू पौर्णिमा 16 जुलै दिवशी साजरी केली जाणार आहे. मग त्याच्या शुभेच्छा  Quotes, Wishes, Images व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून शेअर करायला बिलकूल विसरू नका.

व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.

(Guru Purnima 2019 Messages: गुरू पौर्णिमा निमित्त हे खास संदेश, शुभेच्छापत्रं, Facebook आणि WhatsApp Messages च्या माध्यमातून शेअर करुन व्यक्त करा गुरू बद्दल कृतज्ञता)

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस आणि ग्रिटिंग्स

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Marathi Wishes (Photo Credits-File Image)

गुरुविणा ज्ञान नाही

ज्ञानाविणा आत्मा नाही

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Marathi Wishes (Photo Credits-File Image)

सतत पाठीराख्या राहणाऱ्या

ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या

आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या

गुरुला वंदन करतो

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Marathi Wishes (Photo Credits-File Image)

गुरु जगाची माऊली

जणू सुखाची सावली

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Marathi Wishes (Photo Credits-File Image)

आदी गुरुसी वंदावे

मग साधन साधावे,

गुरु म्हणजे माय बापं

नाम घेता हरतील पाप

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Marathi Wishes (Photo Credits-File Image)

पहा व्हिडिओ:

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.