
Guru Purnima Marathi Wishes: व्यास पौर्णिमा ही गुरू पौर्णिमा (Guru Purnima) म्हणून साजरी केली जाते. 16 जुलै दिवशी यंदा गुरू पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आई, वडील आणि गुरू ही तीन दैवतं मानली जातात. त्यामुळे आयुष्याच्या विविध ट्प्प्यावर प्रत्येकाच्या जडण घडणीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या गुरू बद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'गुरू पौर्णिमा' हा दिवस महत्त्वाचा असतो. मग यंदा तुमच्या गुरूपर्यंत या गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा पोहचवायच्या असतील तर आज डिजिटल युगात SMS, Quotes, Wishes, Images व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून ही मराठमोळी ग्रिटिंग्स शेअर करायला बिलकूल विसरू नका Guru Purnima 2019: गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? काय आहे त्यामागील महत्त्व?
गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस आणि ग्रिटिंग्स
ज्यांनी मला घडवलं
या जगात लढायला,जगायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

ज्ञान
व्यवहार
विवेक
आत्मविश्वास
देणार्या जगातील प्रत्येक गुरूला वंदन!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरूविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम
अवघड डोंगर घाट
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु
गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु हा संतकुळीचा राजा
गुरु हा प्राणविसावा माझा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरू पौर्णिमा शुभेच्छा संदेश व्हिडिओ
गुरू हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. तो लहान किंवा मोठा असतो. आपल्या आजुबाजूच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. म्हणून यंदाच्या गुरू पौर्णिमेदिवशी त्या सार्यांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करा आणि आगामी वर्षभरात अजून नव्या गोष्टी शिकण्यासाठी सज्ज व्हा!