
Geeta Jayanti 2020 Messages: मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीच्या तिथीला गीता जयंती साजरी केली जाणारी आहे. या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणून ही संबोधले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, अघन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुखाने गीतेचा उपदेश दिला होता. द्वापर युगात भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्र मध्ये महाभारताचे युद्ध सुरु होण्यापूर्वी अर्जुनाला जीवन-मरण, मोह-मायाच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी गीतेचा उपदेश दिला होता. यासाठीच अगहन महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी च्या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. यंदाच्या वर्षात गीता जयंती 25 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे.(Geeta Jayanti 2020: मोक्षदा एकादशी दिवशी साजरं करण्याचं महत्त्व)
भगवान श्रीकृष्णाच्या द्वारे गीतेच्या उपदेशाचे आज ही पालन केल्यास आयुष्यात सफलता मिळते. ऐवढेच नाही तर श्रीमद भगवद गीतेत व्यक्तीच्या सर्व समस्यांचे उत्तर लपलेले आहे. तर गीता जयंती निमित्त मराठमोठ्या शुभेच्छा, Wallpapers, Images, Wishes पाठवून जाणून घ्या श्रीमद भगवद गीतेमधील सार.(Mokshada Ekadashi 2020: 'मोक्षदा एकादशी'चं व्रत केल्याने होते मोक्ष प्राप्ती; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी)
मनुष्य आपल्या विश्वासाने बनतो
जसा तो विश्वास ठवतो
तसेच तो बनतो
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेला दिवस आणि येणाऱ्या उद्याच्या दिवसाची चिंता करु नका
कारण जे होणार ते आजच होईल
जे काही होते ते चांगल्यासाठीच होते
त्यामुळे वर्तमानकाळाचा आनंद घ्या
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गीतेत लिहिले आहे
निराश होऊ नकोस
कमजोर तुझी वेळ आहे
तू नाहीश्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या इच्छा शक्तीच्या माध्यमातून स्वत:ला चांगले वळण द्या
कधीही स्व: इच्छेने स्वत:ला उध्वस्त करु नका
हिच इच्छाशक्ती तुमचा मित्र किंवा शत्रू होऊ शकते
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गीता जयंतीचा मुख्य उद्देश हा प्रत्येक व्यक्तीने गीतेमधील उपदेशांचे पालन करत पुढे जावे. गीता आपल्याला ज्ञान, धैर्य, दुख, लोभ आणि अज्ञानता पासून बाहेर निघण्याची प्रेरणा देते. हा एक मात्र ग्रंथ नाही आहे तर हे एक आपल्यामध्येच एक संपूर्ण जीवन आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णाने पुरुषार्थ आणि कर्तव्याचे पालन करण्याची शिकवण देते.