Gita Jayanti | Photo Credits: Pixabay.com

भारतामध्ये मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचा दिवस हा भगवदगीता जयंती (Gita Jayanti) म्हणून साजरा केला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, हा दिवस 25 डिसेंबर दिवशी साजरा केला जातो. दरम्यान 5 हजार वर्षांपूर्वी कुरूक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णाने (Lord Krishna) अर्जुनाला (Arjun) जीवनाचा दिव्य संदेश दिला होता. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजिक इतिहासाचे सार यामध्ये आहे. हा दिवस मोक्षदायिनी किंवा मोक्षदा एकादशी (Mokshada Ekadashi) म्हणून ओळखला जातो. दरम्यान भगवदगीता हा पवित्र ग्रंथ असल्याने त्याचं पठण या दिवशी करण्याची प्रथा आहे. Lord Krishna Quotes: भगवतगीता द्वारा श्रीकृष्णाने केलेले हे '5' उपदेश बदलू शकतात तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन.

यंदा 24 डिसेंबरला गीता जयंती दिवशी मोक्षदा एकादशी रात्री 23 वाजून 15 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर त्याची समाप्ती 26 डिसेंबरला 1 वाजून 55 मिनिटांनी होणार आहे. या काळात हिंदू बांधव कुरूक्षेत्रावर येतात. येथील पवित्र पाण्याच्या तलावांमध्ये डुबकी मारतात. जगभरात या दिवासाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने दिलेल्या वचानांचा पुन्हाने विचार करून त्याच्याद्वारा आपल्या जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. या दिवसाचं औचित्य साधत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गीता जयंती ही मोक्षदा एकादशी देखील असते. हिंदू मान्यतांनुसार मोक्षाचा क्षय करणारी म्हणून ही मोक्षदा एकादशी ओळखली जाते. मानवी जीवनासाठी प्रेरणा, मार्गदर्शक म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जातं. त्या गीतेच्य्या उपदेशाला या दिवसापासून सुरूवात झाल्याने जनसमान्यांमध्ये त्याचं विशेष आकर्षण आहे.

भगवत गीता हा 18 अध्याय व 700 श्लोकांचा महान ग्रंथ आहे. मूळ संस्कृत भाषेत असलेली हीच भगवतगीता पुढे संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेशवरी' म्हणून प्राकृत भाषेत आणला.