![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/2-Gatari-Messages-380x214.jpg)
हिंदूधर्मीयांसाठी श्रावण (Shravan) हा अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यात अनेकजण मांसाहार, मद्यपान टाळतात. त्यामुळे आषाढी अमावस्येचा (Ashadhi Amavasya) दिवस हा अशा मांसाहारप्रेमींसाठी खास असतो. आजकाल हा दिवस गटारी (Gatari) म्हणून साजरा केला जातो. यंदा श्रावण मास हा अधिक महिन्याचा आल्याने एकूण 59 दिवसांचा श्रावण महिना आला आहे. त्यामुळे जर तुम्ही श्रावण पाळणार असाल तर तुम्हांला सुमारे 2 महिने मांसाहारापासून दूर रहावं लागणार आहे. मग असे मांसाहारप्रेमी यंदा गटारीला सार्या मांसाहारी जेवणावर ताव मारणार आहेत. तुमच्या मांसाहारप्रेमी मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आप्तेष्टांना या निमित्ताने 'गटारी' ची आठवण करून या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रिटिंग्स, Images, WhatsApp Status शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.
गटारी म्हणजे सर्वसाधारणपणे श्रावण महिन्यापूर्वी मांसाहार करण्याचा शेवटचा दिवस. श्रावणाची सुरूवात 18 जुलैला होत असल्याने 16 जुलैच्या रविवारी अनेक जण गटारीचं सेलिब्रेशन करणार आहेत. Shravan Month 2023 in Maharashtra: यंदा 59 दिवसांचा श्रावण मास; जाणून घ्या श्रावण आणि अधिक श्रावण मासाच्या महाराष्ट्रातील तारखा काय?
गटारीच्या शुभेच्छा
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/1-Gatari-Messages.jpg)
हॅप्पी गटारी
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/2-Gatari-Messages.jpg)
गटारीच्या शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/5-Gatari-Messages.jpg)
चिकन, मटण, मच्छी,
सगळा बेत करा खास
दारू कशाला हवी एवढाच बेत बास
हॅप्पी गटारी!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/4-Gatari-Messages.jpg)
चिकनचा रस्सा त्याला मटणाची साथ
मच्छीची आमटी सोबत बिर्याणी भात
बांगड्याच्या कढीने भरलेलं ताट
खाऊन घ्या सगळं
श्रावण महिना यायच्या आत
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/3-Gatari-Messages.jpg)
आली आली गटारी
खाण्यापिण्याचा बेत करा लय भारी
एकाच दिवसात लुटून घ्या
पुढल्या 2 महिन्यांची मौज सारी
गटारीच्या शुभेच्छा!
(नक्की वाचा: Gatari Special Recipes: 'गटारी स्पेशल' बेत मध्ये 'चिकन' वर ताव मारायचाय? मग आज ट्राय करा या '5' चमचमीत चिकन रेसिपीज! ).
गटारी च्या निमित्ताने मासे, चिकन, मटणाचे विविध पदार्थ बनवले जातात. घरातील सारी मंडळी या निमित्ताने एकत्र जमून मांसाहारावर ताव मारतात. वैज्ञानिक दृष्टीने पाहता श्रावण हा पावसाळ्याच्या दिवसात येणारा महिना असल्याने मासेमारी तुलनेत कमी होते. माशांचा हा प्रजनानाचाही काळ असल्याने या दिवसात मांसाहार कमी करण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असल्यानेही पचायला जड असे पदार्थ टाळण्याचा यामागील मूळ हेतू आहे.