Gatari Special Recipes: 'गटारी स्पेशल' बेत मध्ये 'चिकन' वर ताव मारायचाय? मग आज ट्राय करा या '5' चमचमीत चिकन रेसिपीज!
Chicken Recipe (Photo Credits: YouTube)

Gatari Amavasya 2019: महाराष्ट्रात 2 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यापासून पुढे सणांची रेलचेल सुरू होते. त्यामुळे मांसाहार खाण्यावर बंदी असते. आज (28 जुलै) म्हणजे मांसाहारावर ताव मारण्याचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे तुमच्याकडेही आज खास बेत असेल. मग आज चिकनचा बेत करणारच असाल तर या महाराष्ट्रातील काही चमचमीत रेसिपीज नक्की आजमावून पहा. महाराष्ट्रात जशी विशिष्ट अंतरावर भाषा बदलते तशी खाद्यसंस्कृती देखील बदलते. मग यंदाच्या गटारीला तुमच्या नेहमीच्या चिकन रेसिपीला थोडं बाजूला ठेवा महाराष्ट्रातील या इतर प्रांतातील रेसिपीज नक्की चाखून बघा

आषाढ अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. पण त्यामागील पारंपारिक प्रथा आता मागे पडू लागल्या आहेत. आताची गटारी अमावस्या ही तिखटाची म्हणजेच मांसाहाराची बनली आहे. श्रावण सुरु होण्याआधी गटारी साजरी करण्यासाठी आजकाल सर्वांचे प्लान्स ठरलेले असतात. त्यात मांसाहारावर म्हणजेच चिकन,मटण आणि मासोळीवर ताव मारण्यासाठी जेवणाची जय्यत तयारी एव्हाना सुरु झाली असेल.

त्यांना मदत म्हणून आज आम्ही महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील चिकनच्या भन्नाट रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत.

  1. मालवणी चिकन

2. आगरी कोळी चिकन

3. नागपूरी सावजी चिकन

4. कोल्हापूरी चिकन

5. मराठवाडा स्पेशल चिकन

हेही वाचा- कुशाग्रबुद्धी आणि सौंदर्यासाठी भरपूर मासे खा!

जे लोक श्रावण पाळणार आहेत आणि त्यांना मांसाहार जबरदस्त ताव मारायचाय. त्यांनी या रेसिपीज अवश्य करुन पाहा. तसेच पुढच्या रविवारी म्हणजेच 28 जुलै रोजी कामिका एकादशी आल्याने गटारी साजरी करता येणार नाही. त्यात यंदा गटारी बुधवारी आल्या कारणाने रविवारचा दिवस पाहात असाल तर उद्याचा रविवार हा गटारी साजरी करण्यासाठी शेवटचा रविवार आहे. मग वाट कसली पाहाताय, लागा तयारीला...