प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मासे (Fish) खाणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. तसेच माश्यांमध्ये कमी फॅक्ट आढळून येतात. मात्र प्रोटीन अधिक प्रमाणात मिळते. त्याचसोबत विविध प्रकारचे मासे बाजारात पाहायला मिळातात. ओमेगा-2 फॅटी अॅसिड असल्याने मासे खाणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरते.

तसेच मासे खाल्ल्याने शरीराला विटामिन, खनिज यांच्यासह विविध पोषक तत्वे आरोग्याला लाभतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, मासे खाल्ल्याने कुशाग्रबुद्धीसह आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते. तर जाणून घ्या मासे खाण्याचे शरीराला होणारे काही फायदे:

-कर्करोगापासून बचाव

जी व्यक्ती नियमित संतुलित प्रमाणात मासे खाते त्या व्यक्तीला कर्करोगाचा धोका कमी असतो. तर ओमेर-3 फॅटी अॅसिडच्या कारणामुळे कॅन्सरचा शरीराला उद्भवणारा धोका टळतो. त्याचसोबत ब्रेस्ट कॅन्सर किंवा पोस्टेट कॅन्सरपासून बचाव होतो. मासे खाल्ल्याने डोळ्यांचे आजारसुद्धा काही प्रमाणात कमी होतात.

-कुशाग्रबुद्धीसाठी मासे खा

जर तुम्हाला कुशाग्रबुद्धी हवी असल्यास भरपूर प्रमाणात मासे खा. माश्यांमध्ये भरपूर प्रमाणात असलेले पोषक तत्व स्मरण शक्ती वाढवण्यास मदत करते.

-हृदयाच्या आजारांपासून बचाव

हृदयाचे आजार असलेल्या व्यक्तींना मासे खाल्ल्यास त्यांना या संबंधित त्रास कमी होते. त्याचसोबत रक्तातील पेशी अधिक मजबूत होतात.

-त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

माश्यांमध्ये आढळणारे ओमेगा-3 फॅक्टमुळे त्वचा आणि केसांची चमक अधिक वाढते. तसेच त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाणसुद्धा कमी होते.

-उच्चरक्तदाब कमी होतो

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यास मांसाहार करणे कमी करा. त्याऐवजी मासे खाण्यास सुरुवात करा. माश्यांमध्ये असलेल्या कमी फॅट्समुळे उच्चरक्तदाब नियंत्रित राहतो.

(रोजच्या आहारात तूपाचा समावेश केल्यास होऊ शकतात हे 5 उपयुक्त फायदे)

त्यामुळे मासे खाणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर मानले जाते. तसेच विविध प्रकारच्या माशांमधील पोषक तत्वांमुळे आपल्या शरीराला मजबुती प्राप्त होते.