रोजच्या आहारात तूपाचा समावेश केल्यास होऊ शकतात हे 5 उपयुक्त फायदे
आतापर्यंत जर तुम्ही वजन वाढेल म्हणून तूपाचे सेवन करत नसाल, तर तुम्ही मोठी चूक करत आहात असेच आम्ही म्हणू. जाणून घ्या तूपाचे 5 महत्त्वपुर्ण फायदे
शुद्ध तूपाचा (Ghee) रोजच्या आहारात वापर करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आहे. घरातील वडिलधारी व्यक्ती नेहमी तूपाचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. कारण तूप पौष्टिक आहार असल्याने शरीराला हे खूपच फायद्याचे आहे. तूप हे एक असे सुपरफूड आहे, ज्यात बरेच महत्त्वाचे असे उपयुक्त गुणधर्म दडलेले आहेत. तूपाच्या सततच्या सेवनाने शरीराचे इम्यून सिस्टम मजबूत राहते आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही मदत होते.
त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही वजन वाढेल म्हणून तूपाचे सेवन करत नसाल, तर तुम्ही मोठी चूक करत आहात असेच आम्ही म्हणू. जाणून घ्या तूपाचे 5 महत्त्वपुर्ण फायदे
1. शक्ती वाढते आणि उत्साह निर्माण होतो
तुमच्यातील शारीरिक कमतरता दूर करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी तूपाचा उपयोग होतो. तसेच तूप पचण्यास चांगले असल्याने आपले शरीर सुदृढ आणि निरोगी राहते.
2. वजन नियंत्रित ठेवते
तूपात अमिनो एसिड असते. त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी विरघळण्यास मदत होते. फॅट सेल्स ला मूळ आकारात आणण्यासाठी मदत करतात. याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील फॅट कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात आणण्यास मदत करतात.
3. शरीराची लवचिकता वाढवते
जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर, तुमच्या डाएटमध्ये तूपाचा समावेश करा. कारण तूप गुडघ्यात असलेला द्रव पदार्थ कमी होऊ देत नाही. त्यामुळे तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत नाही. तूपाने शरीरात लवचिकता निर्माण होते.
4. डोके आणि बुद्धीसाठी चांगले
आयुर्वेदानुसार, तूपामुळे तुमची स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते. यात व्हिटामिन ए,डी,ई आणि के असतात. जे शरीरासाठी अत्यावश्यक असे घटक आहेत. व्हिटामिन ए डोळ्यांसाठी, व्हिटामिन डी थकवा दूर करण्यासाठी आणि व्हिटामिन ई हृदयासाठी आणि व्हिटामिन के हाडांसाठी उपयोगी आहेत.
5. कॉलेस्ट्रोल घटविण्यास मदत
तूपाच्या नियमित सेवनाने कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. याने तुमचे बटरिक एसिड पचनक्रिया खूपच चांगली आणि सशक्त बनते. यात काही असे गुणकारी तत्व आहेत जे शरीरातील कॉलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.
हेही वाचा - चेहऱ्याच्या नितळ स्किनसाठी उपयुक्त Ghee, जाणून घ्या फायदे
हे फायदे ऐकून कदाचित तुम्ही आजपासून तुमच्या दैनंदिन आहारात तूपाचे सेवन करण्यास सुरुवात कराल. शरीर आणि आरोग्याला खूपच फायदेशीर असणारे तूपाचे सेवन तुम्ही अवश्य करावे असे आम्ही येथे सांगू इच्छितो.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2019 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

