Ganesh Visarjan | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

काल घरोघरी मंडळात अगदी थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. पण आज दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप (Ganpati Visarjan) देण्याची वेळ आली आहे. तरी गणेशाला हसतमुखाने ज्या प्रमाणे वाजत गाजत आपल्या घरी आणतो अगदी त्याचप्रमाणे उत्साहात निरोप देण्याची परंपरा आहे. तरी बाप्पाच्या आगमनाची, प्रतिष्ठापनेची जशी विशेष पध्दती आहे त्याचप्रमाणे गणरायाच्या विसर्जनाची दरम्यान पुजेची विशेष पध्दती आहे. तीच आम्ही तुमच्यासाठी घेवून आलेलो आहोत. त्याच पद्धतीने गणपती विसर्जन करण्यापूर्वी गणपती मूर्तीची विसर्जन पूजा (Visarjan Pooja) केली जाते. या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

 

गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी आपण रोज त्याची ज्याप्रमाणे भक्तीभावाने पुजा आरती करतो तशीच पुजा करावी. प्रसादाला विशेष म्हणून बाप्पाचे आवडते पदार्थ लाडू, मोदकाचा प्रसाद करावा. तसेच तिर्थप्रसाद आणि कालाप्रसाद करावा. नंतर बाप्पाची आरती करुन गणेशमुर्ती जरा हलवून ठेवावी आणि नंतर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषासह बाप्पाला निरोप द्यावा. (हे ही वाचा:-Ganeshotsav 2022: राज्यात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेच आयोजन, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा)

 

विसर्जन स्थळी पोहोचल्या नंतर पुनश्च एकदा बाप्पाची आरती करावी. त्याला प्रसादाची शिदोरी द्यावी आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करावं. विसर्जन करुन घरी परतल्यानंतर पुन्हा एकदा बाप्पाची स्थापना केलेल्या जागेची आरती करावी आणि यावर्षी काही चुक भुल झाल्यास माफी मागत पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करावी.