Ganeshotsav 2022: राज्यात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेच आयोजन, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा
गणपती बाप्पा (फाईल फोटो)

गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav 2022) राज्यात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ही घोषणा करण्यात आली आहे. तरी स्पर्धेसाठी उत्सुक मंडळांनी भाग घेण्यासाठी मंडळांना अर्ज (Registration) करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2022 असुन इच्छुक मंडळानी उत्स्फुर्त प्रतिसाद देण्याचं आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्या मंडळांना मजबूत बक्षीस देण्यात येणार आहे. तरी राज्यभरातील सगळेचं मंडळ या स्पर्धेत सहभागी होवू शकतात. या स्पर्धेसाठी प्रशासनाकडून कुठल्याही अटी नाही तरी अर्ज प्रक्रीया कालावधीत पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे.

 

राज्यभरातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मंडळास पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकास दोन लाख 50 हजार रुपये तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपये इतक्या रकमेचे बक्षीस आणि पारितोषिक देण्यात येणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या स्पर्धेला जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी या स्पर्धेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती पण मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता ही तारीख 3 दिवसांनी वाढवत म्हणजे 2 सप्टेंबर करण्यात आली. (हे ही वाचा:- Ganeshotsav 2022: मी शिवसेना बोलते, गणपती मंडळाकडून साकारलेल्या देखाव्यावर पोलिस कारवाई)

 

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या अधिकृत वेबसाईटवर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करण्यात आलेला आहे. तरी संबंधीत नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल आयडीवर पाठवायचा आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे किंवा स्थानिक पोलिस स्थानकात नोंदणी करणे अनिवार्य आहे. विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत उत्कृठ गणेश मंडळांची निवड करण्यात येणार आहे.