Gandhi Jayanti Marathi Messages and Wishes: भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची यंदा 151 वी जयंती आहे. 2 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस गांधी जयंती (Gandhi Jayanti) म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय दिनांपैकी एक असलेल्या गांधी जयंती या दिवसाचं महत्त्व केवळ एक शासकीय सुट्टी इतकं नसून त्यांच्या विचारांचा वारसा समजून घेण्याचा, शक्य तितका तो पेलण्याचा एक दिवस आहे. जगाला शांती, सत्य आणि अहिंसा या बहुमोल वचनांची ओळख करून देत त्याचं महत्त्व पटवून देणार्या बापूजींचा जन्मदिन दरवर्षी भारतामध्ये खास पद्धतीने साजरा केला जतो. यंदा भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यक्रमांना छेद देत, गर्दी टाळत यंदाची गांधी जयंतीदेखील व्हर्च्युअल जगातच साजरी करावी लागणार आहे. मग जगाला सहिष्णुतेचा वारसा देणार्या महात्मा गांधीजींच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत गांधी जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम याच्या माध्यामातून विश, मेसेजेस, कोट्स, शुभेच्छापत्र याच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.
दरम्यान महात्मा गांधींजीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्राने 2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून देखील जाहीर केला आहे. त्या निमित्ताने संयम, अहिंसा, शांतता याचं महत्त्व सांगणार्या या शुभेच्छा तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. Gandhi Jayanti 2020 Virtual celebration Ideas: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा व्हर्च्युअल जगात गांधी जयंती कशी साजरी कराल?
गांधी जयंती 2020 च्या मराठामोळ्या शुभेच्छा
जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणार्या
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन!
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सीताराम
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवा
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
सत्य, अहिंसा, बंधुता
स्मरो तुम्हा नित वंदिता
गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
गांधी जयंती शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टिकर्स
व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातूनही मेसेज पाठवू शकता. यामध्ये गूगलप्ले स्टोअर वरून तुम्ही गांधी जयंतीच्या शुभेच्छा देणारी व्हॉट्सअॅप स्टिकर्स पॅक डाऊनलोड करून शेअर करू शकता किंवा तुम्ही कस्टमाईज्ड बनवू देखील शकता.
गुजरातच्या पोरबंदर मध्ये जन्मलेले मोहनदास करमचंद गांधी हे पुढे महात्मा गांधी आणि बापुजी झाले. भारताला ब्रिटीश राजवटीच्या जुलमातून अहिंसेच्या मार्गाने बाहेर काढण्यात मोलाचा वाटा आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात विशेष स्थान असलेले गांधी तुमच्या आचरणात आणि विचारातही ठेवण्यासाठी आजच्या दिवशी या गांधी जयंतीच्या शुभेच्छा नक्की शेअर करून तुमची आदरांजली अर्पण करा.