Dussehra 2019: दसर्‍याच्या पूजेत आवश्यक 'सरस्वती चिन्ह' पाटीवर ते रांगोळीच्या स्वरूपात कसं रेखाटाल? (Watch Video)
Saraswati Symbol (Photo Credits: Instagram)

दसरा ( Dussehra) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. विजयादशमी (Vijayadashami) किंवा दसरा सण हा केवळ नवरात्रीची सांगता करणारा नव्हे तर या दिवशी सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे. ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी या दिवशी विद्येची देवता असणार्‍या सरस्वतीचं देखील पूजन केलं जातं. पाटीवर सरस्वतीचं प्रातिनिधिक चित्र रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्यासोबतच शस्त्र, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्याठिकाणी 'शस्त्र' रूपी वापरल्या जाणार्‍या वस्तूंचे दसर्‍या दिवशी पूजन केले जाते. मग सरस्वती पूजन करण्यासाठी पाटीवर, कागदावर सरस्वतीचं चिन्हं कसं रेखाटायचं हे तुम्हांला ठाऊक आहे का? Happy Dussehra 2019 Wishes: दसऱ्याच्या शुभेच्छा SMS, मराठी ग्रीटिंग्स,Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!

सरस्वती देवी ही ज्ञानाची देवता आहे. त्यामुळे दसर्‍यादिवशी तिची खास रूपात पूजा केली जाते. पाटीवर किंवा कागदावर सरस्वतीचं चित्र रेखाटून तुम्ही दसर्‍यादिवशी कशी पूजा कराल? हे पाहण्यासाठी हे काही व्हिडिओ नक्की पहा. यामुळे तुम्हांला झटपट आणि अचूक सरस्वतीचं चिन्ह  रेखाटायला मदत होईल. नक्की वाचा: Dussehra 2019: दसरा दिवशी आपट्याची पानं 'सोन्याच्या' स्वरूपात का वाटतात?

सरस्वती रेखाटण्याच्या काही झटपट पद्धाती 

पाच '१' च्या माध्यमातून तयार होणारं सरस्वती चिन्ह

कागदावरील सरस्वती चिन्ह

रांगोळी स्वरूपातील सरस्वती चिन्ह

महाराष्ट्रामध्ये दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पानं वाटण्याची पानं वाटण्याची पद्धत आहे. आपट्याची पानं 'सोन्याच्या' स्वरूपात वाटली जातात. तसेच घरात शस्त्रांची पूजा केली. गोडा-धोडाचे जेवण केलं जाते. घटस्थापना पासून नऊ रात्री आणि दहा दिवसांचा सण मोठ्या धामधुमीत साजरा केल्या नंतर दसर्‍यादिवशी या सणाची सांंगता केली जाते. देवीच्या मूर्तीचं, घटाचं या दिवशी विसर्जन केलं जातं. उत्तर भारतामध्ये रामलीला सादर करून तसेच रावणाचे दहन करून  दसर्‍याचा सण साजरा केला जातो.