Dussehra Wishes in Marathi (File Photo)

Dasara 2019 Wishes & Messages in Marathi: शारदीय नवरात्रीची सांगता विजयादशमी (Vijaya Dashami)  म्हणजेच दसरा (Dussehra) या सणाने होते. यंंदा दसरा हा सण (8 ऑक्टोबर) दिवशी साजरा केला जाणार आहे. या सणाचं औचित्य साधून अनेकजण फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस द्वारा दसर्‍याच्या शुभेच्छा, दसर्‍याच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, HD Images शेअर करुन हा दिवस खास बनवतात. मग साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या शुभेच्छा तुम्हांला मित्र परिवारासोबत, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, SMS, मेसेजेस नक्की शेअर करा आणि तुमचा आनंद द्विगुणित करा.

दसरा आणि विजयादशमी हा सण देशभरात विविध स्वरूपात साजरा केला जातो. उत्तर भारतात दसर्‍या दिवशी रामलीला सादर करून रावणाचं दहन केलं जातं. तर कर्नाटकातील म्हैसूर पॅलेसमध्ये हत्तीवरुन मिरवणूक काढली जाते. महाराष्ट्रात दसर्‍या दिवशी आपट्याची पानं सोन्याच्या स्वरूपात वाटण्याची प्रथा आहे. मग या दसर्‍याच्या शुभेच्छा डिजिटल युगात सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शेअर करताना व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम द्वारा शेअर करायला विसरू नका. नक्की वाचा: Dussehra 2019: दसरा दिवशी आपट्याची पानं 'सोन्याच्या' स्वरूपात का वाटतात?

दसर्‍याच्या मराठमोळ्या शुभेच्छा 

उमलतो आनंद मनी

जल्लोष विजयाचा हसरा,

उत्सव प्रेमाचा

मुहूर्त सोनेरी हा दसरा

शुभ दसरा

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

सण विजयादशीचा खास आज

जाळूया तुमच्या आमच्या मनातल्या मत्सराचा रावण आज

शुभ दसरा

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

उत्सव हा विजयाचा

दिवस सोनं लुटण्याचा

जुने हेवे दावे विसरून सारे

दिवस फक्त आनंद लुटण्याचा

दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

आपट्याची पानं, झेंडुची फुलं

घेऊन आली आज विजयादशमी,

दसर्‍याच्या या शुभ दिनी

सुख, समृद्धी लाभो आपुल्या जीवनी

दसर्‍‍याच्या हर्दिक शुभेच्छा!

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

मुहूर्त हसरा नवसंकल्पांचा

सण हा दसरा उत्कर्षाचा

मिळोनी साजरा करू

उत्सव तो नवहर्षाचा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra Wishes in Marathi (File Photo)

दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यासाठी GIFs 

via GIPHY

विजयादशमी शुभेच्छा GIFs

via GIPHY

दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडीओ

दसरा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवस असल्याने या दिवशी घटाची, देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते, मात्र त्यासोबत कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात केली जाते. त्यासाठी खास मुहूर्त पाहण्याची गरज नसते. अनेकजण या दिवशी सोनं खरेदी करता, गाडी, घर अशा मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे तुम्ही देखील हा विजया दशमी आणि दसर्‍याचा सण कसा साजरा करणार आहात? हे आमच्यासोबतही नक्की शेअर करा. लेटेस्टली परिवाराकडून तुम्हा सार्‍यांना दसरा आणि विजया दशमी सणाच्या खूप खूप शुभेच्छा! हॅप्पी दसरा.