
Dr Babasaheb Ambedkar Quotes In Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची पुण्यतिथी म्हणजे महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Diwas). 64 वर्षांपूर्वी 6 डिसेंबर दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यानंतर दरवर्षी 6 डिसेंबरला भीम अनुयायी चैत्यभूमीभूमीवर एकत्र येऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करतात. यंदा कोरोना संकटामुळे भीम अनुयायींना घरातूनच आपली आदरांजली अर्पण करण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे. मग 'शिका, संघटीत व्हा संघर्ष करा' असा बौद्ध धर्मीयांना मोलाचा संदेश देणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे बहूमोल विचार, वचनं, Quotes भीम अनुयायींप्रमाणेच इतर मित्रमंडळी, नातेवाईक यांना इंटरनेटच्या माध्यमातून WhatsApp, Twitter, Facebook, Instagram द्वारा शेअर करण्यापेक्षा दुसरी कोणती मोठी आदरांजली असू शकते?
भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील त्रृटी समोर आणत आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्यांना आधार दिला. बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याची शिकवण पुन्हा समाजात पसरवण्याचं काम विविध मार्गांनी केलं. सोबतच मागास राहिलेल्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्याच्या जोरावार प्रगती करण्याच्या, नोकरी धंदा करण्याच्या नव्या दिशा खुल्या करून दिल्या. समाजात अमुलाग्र बदल करणार्या अशा महामानवाला या महापरिनिर्वाण दिना निमित्त वंदन केले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव भिमराव रामजी आंबेडकर असे आहे. 14 एप्रिल 1891 या दिवशी त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. तर, दिल्ली येथील निवासस्थानी 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तब्बल 64 विषयांत मास्टर होते. ते हिंन्दी, पाली, संकृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पार्शियन आणि गुजराती अशा 9 भाषांचे जाणकार होते. सर्व भाषांमध्ये त्यांना लिहिता वाचता आणि बोलताही येत असे. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षांपर्यंत जवळपास सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला.