Diwali 2021 Abhyang Snan Shubh Muhurat: नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नानाचा पहा यंदाचा मुहूर्त काय?
अभ्यंगस्नान । PC: pixabay.com

दिवाळीच्या सणामध्ये अश्विन कृष्ण चतुर्दशी चा दिवस हा नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi)  म्हणून साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवसामध्ये पहिलं अभ्यंगस्नान (Abhyang Snan) हे नरक चतुर्दशी च्या पहाटे करण्याची पद्धत आहे. यंदा नरक चतुर्दशी 4 नोव्हेंबर दिवशी आहे. दिवाळीच्या धामधुमीमध्ये पहिल्या आंघोळीला पहाटे अंगाला सुगंधी तेल आणि उटण्याने मालिश करून आंघोळ करण्याची पद्धत आहे. पण हिंदू पुराणकथा आणि रूढी-परंपरांच्या माहितीनुसार, अभ्यंग स्नानासाठी रात्रीच्या शेवटच्या प्रहरापासून अरूणोदय पर्यंत गौणकाल आहे. अरूणोदय ते चंद्रोदय हा मध्यमकाळ आहे तर चंद्रोदय ते सूर्योदय हा काल मुख्य काळ आहे. मग यंदा नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नानासाठी चंद्रोदय ते सूर्योदय हा काळ किती वाजताचा आहे? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की वाचा. नक्की वाचा: Diwali 2021 Messages: दिवाळी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Status, Facebook Messages द्वारे शेअर करुन साजरा करा दीपोत्सव! 

नरक चतुर्दशी 2021 अभ्यंगस्नान मुहूर्त

पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला पण मृत्यूसमयी त्याचे श्रीकृष्णापाशी एक ईच्छा बोलून दाखवली की 'आजच्या दिवशी (तिथीला) जो अभ्यंगस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये तसेच माझा मृत्यू दिन सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा.' श्रीकृष्णांनी याला तथास्तू म्हटलं. परिणामी नरक चतुर्दशी दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची आणि दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली.

नरक चतुर्दशी 2021 तारीख - 4 नोव्हेंबर 2021, गुरूवार

अभ्यंगस्नान मुहूर्त - चंद्रोदय - पहाटे 5 वाजून 49 तर सूर्योदय 6.40 त्यामुळे या वेळेदरम्यान अभ्यंगस्नान केले जाऊ शकते.

दरम्यान दिवाळी मध्ये दुसरं अभ्यंगस्नान दिवाळी पाडवा दिवशी देखील करण्याची पद्धत आहे. या दिवशी पत्नी पतीला उटणं लावून त्याला आंघोळ घालते. अभ्यंगस्नानाला तीळाचं तेल, आयुर्वेदीक उटणं, नारळाचं दूध यांचा समावेश करून स्नान करण्याची पद्धत आहे. दिवाळी हिवाळ्याच्या दिवसात येत असल्याने शरीरात स्निग्धता वाढवण्यासाठी अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यामधील कोणत्याही गोष्टीचि पुष्टी करत नाही. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धांना पाठींबा देण्याचा आमचा उद्देश नाही.