
Happy Diwali Messages in Marathi: सणांचा राजा अशी ओळख असलेला दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. आश्विन आणि कार्तिक महिन्यात येणारी दिवाळी हा हिंदूधर्मीयांचा मोठा सण. पाच दिवसांच्या हा सण नवे कपडे परिधान करुन, गोडधोड खावून, फटाके फोटून साजरा केला जातो. त्याचबरोबर आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, फराळ याची गंमत वेगळीच असते. सर्वत्र आनंदी आणि उत्साही वातावरण असते. भारतभर साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या प्रत्येक दिवसाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज अशा विविध दिवसांनी दिवाळी संपन्न होते. (Laxmi Pujan 2021 Muhurat & Puja Vidhi: लक्ष्मी पूजन कसे कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)
सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांना शुभेच्छा देऊ शकता. दिवाळी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter, इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन दीपोत्सव आनंदाने साजरा करा. (Laxmi Pujan 2021 Easy Rangoli Designs: लक्ष्मी पूजनासाठी रांगोळीच्या माध्यमातून मातेचं स्वागत करण्यासाठी सोप्या डिझाईन्स, Watch Video)
दिवाळीच्या शुभेच्छा!
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळी सणाचा..
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मीपूजन
समृद्धीचा फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा दिवाळीच्या आनंददायी शुभेच्छा!

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

फटाके, कंदील अन्
पणत्यांची रोषणाई
चिवडा-चकली, लाडू करंजीची ही
लज्जतच न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता
आनंदली दुनिया सारी!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी उत्साह, जल्लोष आणि आनंदाने भरलेली असते. परंतु, उत्साहात काही अपघात होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसंच सध्याच्या कोरोना संकटात नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळे दिवाळी नक्कीच आनंददायी होईल. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या भरभरुन शुभेच्छा!