![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/Naraka-Chaturdashi-or-Choti-Diwali-2019-Date-in-India-new-1-380x214.jpg)
Diwali 2019: आज 25 ऑक्टोबर पासून, देशभरात दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. सर्व धर्मीयांसाठी खास असणारा हा सण विविध प्रांतात वेगवेगळ्या परंपरेनुसार साजरा केला जातो. दिवाळीच्या 5 दिवसांची यंदा धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) मुहूर्तावर नांदी होणार आहे. यादिवशी लक्ष्मी, धनाचे भांडार कुबेर, आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा केली जाते. याशिवाय, अकाली मृत्यूपासून स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण व्हावे तसेच दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत यमदीपदान (Yamdeepdan) करण्याची पद्धत प्रचलित आहे. यंदाच्या दिवाळीच्या वेळापत्रकानुसार वसुबारस आणि धनत्रयोदशीच्या योग एकत्र जुळून आल्याने हा दिवस आणखीनच खास आहे. यादिवशी घरातील देवतांसमोर दिवा लावून तसेच घराबाहेर यमाला समर्पित करणारा दिवा लावून तुम्हीही तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करू शकता.
चला तर जाणून घेऊयात यमदीपदान करण्याचे महत्व आणि योग्य पद्धती..Happy Dhanteras 2019 Wishes: धनत्रयोदशीच्या मराठी शुभेच्छा, ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरी करा कुबेर जयंती
यमदीपदान महत्व
जीवाचा मृत्यूकाळ हा 13 दिवसांच्या कालचक्रांचा असतो. म्हणजेच मृत्यूनंतर जीव भूलोकातून परलोकात जाण्यासाठी 13 दिवसांचा वेळ घेतो. म्हणूनच मृत्यूनंतर 13 दिवसांनी श्राद्ध घालण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या दिवसातही यमलहरींच्या प्रभावामुळे अकालमृत्यू येऊ नये म्हणून त्रयोदशीदिवशी यमदीपदान केले जाते.
यमदीपदान तिथी: 25 ऑक्टोबर
शुभ मुहूर्त: सायंकाळी 05.49 वाजल्यापासून ते 07.06 पर्यंत
यमदीपदान करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेकडून घातक लहरी प्रवाहीत होत असतात त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम टळावा याकरिता कणकेचा दिवा दक्षिण दिशेला लावला जातो. या दिव्यामध्ये तीळाचे तेल प्रामुख्याने वापरलं जातं. हा दिवस सर्वात आधी घरातील देवांसमोर लावून त्यांनतर हा दिवा घराबाहेर अंगणात किंवा तुळशीबाहेर लावावा. दिव्याची वात ही दक्षिणभिमुख असेल याची दक्षता घ्या. लक्षात ठेवा संध्याकाळी सूर्यस्ताच्या नंतरच हा दिवा अर्पण करायचा आहे. शक्य असल्यास जुन्या दिव्याचा वापर टाळावा.
प्राचीन पुराणातील एका कथेनुसार हेम नामक अकाली मृत्यू झाल्यावर त्यांनी कठोर तपश्चर्या करून यमाकडून वरदान मागितले होते. यावेळी यमाने प्रस्सन होऊन कार्तिक कृष्ण पक्षातील रात्री जो मनुष्य दक्षिण दिशेकडे दिवा लावून माझी आठवण करेल त्याला अकाळी मृत्यूचे भय राहणार नाही असे वरदान दिले.