Happy Dhanteras 2019 Wishes: धनत्रयोदशीच्या मराठी शुभेच्छा, ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरी करा कुबेर जयंती
Happy Dhanteras 2019 Wishes (Photo Credits: File Image)

Dhanteras 2019 Wishes & Messages in Marathi: यंदा 25 ऑक्टोबर पासून दिवाळी (Diwali 2019) च्या सणाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वेळापत्रकात दिवाळीची नांदी ही धनत्रयोदशी आणि वसुबारस (Vasubaras) या तिथीच्या मुहूर्ताने होईल. हिंदू कालदर्शिकेनुसार आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी (Dhantrayodashi) असते. धनाची देवता लक्ष्मी आणि धनाचे भांडार कुबेर (Kuber Jayanti) यांची पूजा करण्याचा हा खास दिवस असतो, आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी धन्वंतरी जयंती (Dhanvantari Jayanti)  देखील साजरी केली जाते. कोणत्याही सणाप्रमाणे दिवाळीची मजा अनुभवण्यासाठी आपली जवळची मंडळी सोबत असतील तर खऱ्या अर्थाने सेलिब्रेशनमध्ये जीव येतो. पण प्रत्येकाच्या व्यवस्थ शेड्युल मधून वेळ मिळेलच असे सांगता येत नाही. असं असलं तरी तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि जवळच्या मंडळींना ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images च्या माध्यमातून खास दिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.

Diwali 2019: धनतेरसला सोनं खरेदी करताय? तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

अलीकडे सोशल मीडियाच्या वेगवान जगात काही क्षणाच्या अवधीत तुम्हाला क्रिएटिव्ह होऊन शुभेच्छा देता याव्यात याकरिता आम्ही शुभेच्छापत्र घेऊन आलो आहोत. त्यामुळे ऐनवेळी कोणाला काय संदेश पाठवू  या गुंत्यातुन  तुम्हाला सुटका मिळणार आहे. यंदा धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर ही काही अस्सल मराठमोळी ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images तुम्ही WhatsApp Status, Twitter , Facebook , Instagram द्वारे शेअर करू शकता..

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा

आंनदाने सजल्या दाही दिशा

धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी

आपणास मनःपूर्वक सदिच्छा

शुभ धनतेरस

Happy Dhanteras 2019 Wishes (Photo Credits: File Image)

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Happy Dhanteras 2019 Wishes (Photo Credits: File Image)

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न राहो

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,

आनंदाची आणि भरभराटीची जाओ

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

Happy Dhanteras 2019 Wishes (Photo Credits: File Image)

रांगोळीच्या रंगात

आयुष्य रंगु देत

दिवाळीच्या दिव्यासारखे

तेजाने उजळू देत

धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभुदे

आपणास व आपल्या कुटुंबास धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा

Happy Dhanteras 2019 Wishes (Photo Credits: File Image)

धनत्रयोदशीच्या दिवस का आहे खास आणि यादिवशी कधी कराल धनाची पूजा? जाणून घ्या शुभ मुहूर्त व विधी

धनत्रयोदशीच्या शुभ दिनी

व्हावी बरसात धनाची

साधून औचित्य दीपावलीचे

बंधने जुळवित मनाची

धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Dhanteras 2019 Wishes (Photo Credits: File Image)

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देण्यासाठी GIFs

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर, विष्णू, लक्ष्मी, या देवतांची पूजा करून आपल्या आयुष्यात आर्थिक तुटवडा येऊ नये, कुबेराची सदैव कृपा राहावी अशी प्रार्थना केली जाते. तसेच धन्वंतरी पूजनाच्या निमित्ताने आपल्यासाठी उत्तम आरोग्याचे वरदान मागितले जाते.