महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष महिन्याचा (Margashirsha Month) पहिला दिवस हा देव दीपावली (Dev Deepavali) म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा देव देपावली 5 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. देवदीपावली हा खंडोबाच्या (Khandoba) देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. त्यामुळे मार्गाशीर्ष मासारंभी देव दीपावली साजरी केली जाते. श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यातही सण-उत्सव, व्रत - समारंभ यांची रेलचेल असते मग या मंगल पर्वाच्या पहिल्या दिवसाची आनंदी वातावरणामध्ये सुरूवात करताना तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना देव दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली ही मराठमोळी शुभेच्छापत्र, Wishes, Greetings, HD Images, Wallpapers, WhatsApp Status, Facebook Messages तुम्ही सोशल मीडीयात शेअर करून या आजच्या दिवसाचा आणि नव्या महिन्याची सुरूवात आनंदी वातावरणामध्ये करू शकता.
देव दीपावली च्या दिवशी मल्हारी मार्तंड खंडोबाच्या देवळात दीपोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत (चंपाषष्ठी) सहा दिवसांची नवरात्र देखील साजरी करण्याची पद्धत आहे. प्रत्येक कुटुंबाच्या रीतीभातींप्रमाणे देव दीपावली साजरी करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. नक्की वाचा: Margashirsha 2021: मार्गशीर्ष मासारंभाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देण्यासाठी मराठमोळी ग्रीटिंग्स.
देव दीपावली च्या शुभेच्छा
देव दीपावली हा महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे पण उत्तर भारतात प्रामुख्याने काशीला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली साजरी केली जाते. पुराण कथेनुसार भगवान शंकराने जेव्हा त्रिपुरासुराचा वध केला तेव्हा देवांनी याच दिवशी दीपावली साजरी केली. त्यानंतर मागील काही वर्षांपासून काशीमधल्या विविध घाटांवर लाखो दिवे लावले जातात. सोबतच दशाश्वमेघ घाटावरती गंगेची भव्य आरती करण्याची प्रथा आहे.