Khandoba Somvati Amavasya Yatra: खंडोबा सोमवती अमावस्या यंदा 13 नोव्हेंबरला; पहा पालखीच्या वेळा, अन्य नियमावली !
Khandoba | FB

महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा (Khandoba Somvati Amavasya Yatra) यंदा 13 नोव्हेंबरला भरणार आहे. सकाळी 7 च्या सुमारास खंडोबा गडामधून हा पालखी सोहळा सुरू होणार आहे. दुपारी 12-12.30 च्या सुमारास कर्‍हा नदीवर खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीचं स्नान संपन्न होणार आहे. या यात्रेसाठी विश्वस्तांची बैठक झाली असून त्यामध्ये नियोजनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट ड्रेसकोड मध्ये तैनात केले जाणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा,पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोमवती अमावस्या मुहूर्त

रविवार 12 नोव्हेंबर दिवशी दुपारी 3 च्या सुमारास अमावस्या सुरू होणार आहे. ही अमावस्या 13 नोव्हेंबर दिवशी दुपारी अडीज वाजेपर्यंत असणार आहे. जेजुरी मध्ये सोमवती अमावस्येला मोठी गर्दी असते.

सोमवती अमावस्येला खंडोबा गडावरून उतरत असताना अपघात होऊन मागील वर्षी काही जण जखमी झाले होते. यंदा अपघात टाळण्यासाठी, चेंगराचेंगरीची स्थिती टाळण्यासाठी पालखीत खांदेकर्‍यांना विशेष ड्रेस कोड देण्यात आला आहे. 1300 खांदेकर्‍यांना त्यासाठी विशेष टी शर्ट दिले आहेत. या विशिष्ट ड्रेस कोड शिवाय अन्य कोणालाही खांदा देता येणार नाही. Jejuri Somvati Amavasya 2023: जेजुरी गडावर सोमवती यात्रेचा उत्साह; खंडेरायाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी .

भेसळयुक्त भंडाऱ्यावर बंदी घालण्यात आली असून कोणीही बनावट भंडारा विकल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आले आहे.