जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. जर सोमवारी अमावस्या (Somvati Amavasya) आली तर जेजुरीच्या (Jejuri) गडावर सोमवती यात्रेचे आयोजन केले जाते. या परंपरेनुसार आज जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवती यात्रेच्यावेळी खंडोबाच्या उत्सव मूर्तीला कऱ्हा नदीत स्नान घातले जाते. नंतर गडावर नेऊन मूर्तीची विधीवत पूजा केली जाते. या सोहळ्यात आणि नंतर गडावरील दर्शन सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. खंडेरायाच्या दर्शनाला लाखो भाविक येतात.
पहा ट्विट -
श्री क्षेत्र जेजुरी सोमवती अमावस्या यात्रा २०२३
भंडाऱ्याची उधळण अन खंडोबा देवाचा जयघोष करीत भाविकांकडून जेजुरी गडावर सोमवती अमावस्या सोहळ्याचा आनंद लुटला जात आहे.
पोलिसांकडून वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. pic.twitter.com/XtPlI3QOkm
— Pune Rural Police (@puneruralpolice) February 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)