श्रावणाप्रमाणेच व्रत वैकल्य, सणांची धामधूम असलेला मराठी कॅलेंडर मधील एक महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष (Margashirsha) हा मराठी महिन्यांमधील नववा महिना आहे. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार 5 डिसेंबर दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात होणार आहे. मग या मंगलमय महिन्याची सुरूवात आनंदी,चैतन्यमय वातावरणामध्ये करण्यासाठी आज मार्गशीर्ष मासारंभी तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या दिवसाच्या शुभेच्छा देत नव्या महिन्याची सुरूवात आनंद द्विगुणित करून करायला विसरू नका.
देव दीपावलीने मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात होते. पुढे चंपाषष्ठी पर्यंत खंडोबाच्या देवळात नवरात्र साजरी केली जाते. सोबतच मार्गशीर्ष महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. सोबतच या महिन्यात दत्त जयंती,गीता जयंती असे महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात. नक्की वाचा: Dev Deepavali 2021 Wishes In Marathi: देव दीपावलीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा दीपोत्सव.
मार्गशीर्ष महिन्याच्या शुभेच्छा
मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा 5 डिसेंबर दिवशी मार्तंडभैरव षडरात्रोत्सवारंभ, देव दीपावलीने महिन्याची सुरूवात होत आहे. त्यानंतर 9 डिसेंबर दिवशी चंपाषष्ठी साजारी केली जाणार आहे. सोबतच या महिन्यात 4 गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत केले जाणार आहे. 14 डिसेंबरला गीता जयंती आहे आणि दत्त जयंती 18 डिसेंबर दिवशी आहे. 2 जानेवारी दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सांगता होणार आहे.