मार्गशीर्ष (Margashirsha) महिना सुरू झाला की आपसूकचं मार्गशीर्ष गुरूवार व्रतासाठी (Margashirsha Guruvar Vrat) महिलांची लगबग सुरू होते. मार्गशीर्ष महिन्यात हिंदू महिला महालक्ष्मी मातेचं व्रत करतात. अनेकजणी या महिन्यात प्रत्येक गुरूवारी व्रत करताना दिवसभराचा उपवास करतात. शेवटच्या गुरूवारी सवाष्ण महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून त्याची सांगता करण्याची दरवर्षीची पद्धत आहे. मग यंदा मार्गशीर्ष माहिना कधी सुरू होणार? यावर्षी किती गुरूवारी व्रत आहे? शेवटचा गुरूवार कधी आहे? या तुमच्या मनातील सार्या प्रश्नांची उत्तरं इथे पहायला मिळतील. त्यासाठी खालील दिलेली माहिती नीट वाचा. हे देखील वाचा: Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी, नियम व वैभवलक्ष्मी घट मांडणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती .
मार्गशीर्ष महिन्यात अनेक घरात मांसाहार टाळत दर गुरूवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते. घटाला आकर्षक स्वरूपात सजवलं जातं त्याची पूजा केली जाते. या निमित्ताने घराघरात आनंदाचं, चैतन्याचं आणि प्रामुख्याने मंगलमय वातावरण निर्माण होतं. मग या व्रतासाठी यंदा तुम्ही देखील सज्ज होत असाल तर पहाच मार्गशीर्ष गुरूवार 2021 व्रताचं वेळापत्रक.
मार्गशीर्ष गुरूवार 2021 व्रत तारखा
पहिला गुरूवार - 9 डिसेंबर 2021
दुसरा गुरूवार - 16 डिसेंबर 2021
तिसरा गुरूवार - 23 डिसेंबर 2021
चौथा गुरूवार - 30 डिसेंबर 2021
मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात यंदा 5 डिसेंबरला होत आहे तर सांगता 2 जानेवारी दिवशी होणार आहे. यामध्ये मार्गशीर्ष गुरूवार व्रताचे 4 दिवस आहेत. 30 डिसेंबर दिवशी या व्रतामधील शेवटचा गुरूवार असणार आहे. त्यादिवशी सवाष्ण महिला, कुमारिका यांनी घरी बोलावून लक्ष्मीच्या रूपात घरी आलेल्या स्त्रीचा आदर करण्याची पद्धत आहे.