COVID-19 Vaccine Update: कोविशिल्ड लसीला डिसेंबर 2020 मध्ये आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता- Reports
Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) यांच्या भारतात विकसित होणाऱ्या कोविशिल्ड लसीला भारत सरकारकडून आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळू शकते. डिसेंबरमध्ये लसीच्या होणाऱ्या अंतिम चाचण्यांचा अहवाल सकारात्मक असल्याचा भारत सरकारकडून हा महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती सीरम इंस्टीट्युटचे (Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी Bloomberg शी बोलताना दिली आहे. सीरम इंस्टीट्युड ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असून कोविशिल्ड (Covishield) लसीला मान्यता मिळाल्यावर त्याचेही उत्पादन करण्यात येणार आहे.

Bloomberg रिपोर्टनुसार, कोविशिल्ड लसीचे 100 मिलियन डोसेस डिसेंबरपर्यंत तयार ठेवण्याची सीरम इंडिस्ट्युड ऑफ इंडियाची योजना आहे. लसीला आत्पकालीन वापराची मान्यता मिळाल्यानंतर लस देण्यात येईल. मागील 2 महिन्यात SII कडून या लसीचे 40 मिलियन डोसेस तयार करण्यात आले आहेत आणि आता Novavax Inc's लसीच्या निर्मितीची तयारी सुरु आहे.

AstraZeneca आणि Novavax व्यतिरिक्त SII ने 3 वेगवेगळ्या डेव्हलपर्ससोबत करार केला आहे. हा मोठा धोका असल्याने आम्हाला थोडी चिंता होती. मात्र अ‍ॅस्ट्राझेनेका आणि नोव्हाव्हॅक्स दोन्हीही लसी चांगल्या आहेत. क्षमता आणि उत्पादन अडथळ्यांमुळे संपूर्ण जगभरातील लोकांचे लसीकरण 2024 पर्यंत होणार नाही, असे पुनावाला यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वीच्या मुलाखतीत त्यांनी कोविशिल्ड लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होईल अशी माहिती दिली होती. (कोविड-19 लस मिळण्यासाठी सर्वसामान्यांना 2022 पर्यंत वाट पाहावी लागेल- AIIMS संचालक डॉ. रणदीप गुलेरिया)

युकेमध्ये या लसीच्या अॅडव्हान्स चाचण्या होत असून त्यांनी त्यांचा डेटा आमच्यासोबत शेअर केला आणि मग आरोग्य मंत्रालयासोबत आम्ही इमर्जन्सी ट्रायल्ससाठी अप्लाय केले. त्यांनी मान्यता दिल्यानंतर आम्ही भारतात चाचण्यांना सुरुवात केली आणि आम्हाला यश आले. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत आपल्याला लस उपलब्ध होईल. असे त्यांनी गेल्या महिन्यात NDTV ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.