
स्वतंत्र भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस खास आहे. भारताचं संविधान (Indian Constitution) हे 26 नोव्हेंबर 1949 दिवशी तयार झाले होते. संविधान सभेकडून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम केल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 दिवशी हे संविधान भारताला समर्पित केले. त्यानंतर भारताने 26 जानेवारी 1950 दिवशी ते अंमलात आणलं. 26 नोव्हेंबर 2015 रोजी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने प्रथमच भारत सरकारकडून देशभरात संविधान दिन (Constitution Day) साजरा करण्यात आला. आता देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर दिवशी संविधान दिन साजरा केला जातो.मग प्रत्येक भारतीयांसाठी खास असणार्या या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Messages, HD Images, Greetings द्वारा शेअर करत या दिवसाला थोडं अजून स्पेशल करायला विसरू नका.(Constitution Day 2022:संविधान दिनाचा इतिहास आणि संविधाना विषयी काही मनोरंजक तथ्ये, जाणून घ्या सविस्तर.)
भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे. आपली राज्यघटना प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली आहे. ते कॅलिग्राफी आर्टिस्ट होते. 1901 साली दिल्लीत जन्मलेल्या प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी संविधान लिहि00ण्यासाठी एक पैसाही घेतला नव्हता.नक्की वाचा: Constitution Day 2022 Messages: संविधान दिनानिमित्त Wishes, SMS, Quotes, Images द्वारे द्या खास शुभेच्छा!
संविधान दिनाच्या शुभेच्छा





भारतीय राज्यघटनेमध्ये विविध राजकीय तत्त्वज्ञान, नागरिकांचे मूलभूत अधिकार, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, कायदेमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका यांच्यातील अधिकारांचे विभाजन इत्यादी अनेक तरतुदींचा समावेश आहे. भारताचा कारभार या संविधानाच्या आधारे चालतो आणि देशातील लोकशाहीला बळकटी देत आहे. संविधान दिन साजरा करून भारतीय जनमाणसांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि संविधानाचा प्रचार केला जातो.