
Constitution Day 2022 Messages: 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी अतिशय खास दिवस आहे. कारण, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले. म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय संविधान दिन (Constitution Day 2022) म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीच्या संविधान सभागृहात झाली, ज्याला आता संसद भवनाचे 'सेंट्रल हॉल' म्हटले जाते.
देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो, कारण या दिवशी भारतीय राज्यघटना संविधान सभेने औपचारिकपणे स्वीकारली होती. परंतु संविधान दिन साजरा करण्याची परंपरा फार जुनी नाही. 2015 मध्ये, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो. संविधान दिनानिमित्त Messages, Wishes, SMS, Quotes, Images द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील मेसेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -Constitution Day 2022 Wishes: संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Messages, Images, Quotes आणि शुभेच्छापत्रं!)





विविध शाळांमध्ये संविधान दिनानिमित्त स्वच्छता, आरोग्य आणि बंधुतेचा संदेशही दिला जातो. मुले गावागावात जाऊन प्रभातफेरी काढतात. याशिवाय गावागावात पथनाट्याचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये भारतीय संविधानाशी संबंधित गोष्टी लोकांना सांगितल्या जातात, जेणेकरून सर्वसामान्यांना संविधानाची माहिती व्हावी.