Chhatrapati Sambhaji Maharaj
Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Divas:  छत्रपती संभाजी राजे भोसले, थोर मराठा राजा शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र, यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला होता. संभाजी राजे  छत्रपती शिवाजी आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते. संभाजी राजे  फक्त दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले. दरवर्षी 11 मार्च हा संभाजी बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो कारण हाच दिवस आहे ज्या दिवशी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी पंधरवड्याहून अधिक काळ मुघल राजा औरंगजेबाने दिलेल्या  भयंकर यातना सहन करून स्वराज्य स्थापनेसाठी प्राणाची आहुती दिली.. संभाजी स्वतः एक महान राजा आणि योद्धा म्हणून ओळखला जातात. असे म्हटले जाते की, संभाजींनी 150 हून अधिक लढाया लढल्या आणि जिंकल्याही. एक महान योद्धा असण्याबरोबरच, संभाजी हे महान एक व्यक्तिमत्व देखील होते. 

संभाजी महाराजांबद्दल 10 प्रमुख तथ्ये 

1. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी संभाजी महाराजांना अंबरचे राजा जयसिंग यांच्याकडे बंधक म्हणून राहायला पाठवण्यात आले होते.

2. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सुनिश्चित केले होते  की, जरी त्यांचे जीवन सतत संघर्षाने भरलेले असले तरीही संभाजींना एका राजपुत्रासाठी योग्य ते उत्तम शिक्षण मिळावे, संभाजी राजे शास्त्र आणि शस्त्र दोन्ही विद्येत पारंगत झाले.

3. संभाजींचा विवाह जिवुबाईशी राजकीय युतीमुळे झाला होता. मराठा रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले आणि लग्नानंतर तिचे येसूबाई असे नाव ठेवण्यात आले होते. या विवाहामुळे शिवाजी महाराजांना कोकण किनारपट्टीवर प्रवेश मिळाला होता.

4. छत्रपती संभाजी महाराज 15 वर्षांचे होईपर्यंत त्यांना  संस्कृत आणि प्रादेशिक भाषा तसेच पोर्तुगीजसह 13 हून अधिक भाषा अवगत होते. त्यांनी तोपर्यंत एक पुस्तकही लिहिले होते. तसेच, अशी आख्यायिका आहे की, संभाजींनीच प्रथम प्रसिद्ध तामिळ 'सांभार' चा यशस्वी  प्रयोग केला होता, जेव्हा त्यांनी शाही मराठ्यांच्या स्वयंपाकघरात शिजवलेल्या डाळीत चिंच टाकली होती.

5. छत्रपती संभाजी महाराज यांनी कवी कलश यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.

6. शिवाजी महाराजांची विधवा पत्नी आणि संभाजी महाराजांची सावत्र आई, सोयराबाईने तिचा 10 वर्षांचा मुलगा राजाराम याला मराठा राज्याचा वारस म्हणून राज्याभिषेक केला होता. ही बातमी संभाजी महाराजांना  कळताच त्यांनी 20,000 सैन्यासह रायगड किल्ल्यावर कूच केली आणि औपचारिकपणे सिंहासनावर विराजमान झाले.

7. असेही म्हटले जाते की, प्रिन्स अकबर (मुघल सम्राट औरंगजेबाचा मुलगा) ज्याने आपल्या वडिलांविरुद्ध बंड केले होते त्यांनी संभाजीकडे आश्रय घेतला. याचा औरंगजेबाला इतका अपमान वाटला की त्याने संभाजीला पकडले जाईपर्यंत मुकुट न घालण्याचा निर्णय घेतला. 

8. संभाजींनी जवळपास 150 लढाया लढल्या आली सर्व जिंकल्या.

9. गणोजी शिर्के यांनी औरंगजेबाच्या सेनापतीला कळवले की. संभाजी आणि त्यांचे सल्लागार कवी कलश हे एका गुप्त मार्गाने सभेला जात आहेत. तेव्हा औरंगजेब संभाजी महाराजांना कैद करण्यात यशस्वी झाला होता.

 10. असे म्हटले जाते की, संभाजी महाराजांच्या हत्येचा आदेश देण्यापूर्वी औरंगजेबाने म्हटले होते की, संभाजींसारखा एक मुलगा असता तर तो दख्खनसह संपूर्ण भारतीय उपखंडात आपले राज्य स्थापन करू शकला असता. संभाजीचा मृत्यू हा अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला होता.

औरंगजेबाने संभाजी आणि त्याचा सल्लागार कवी कलश यांना पकडले. त्यांचा अपमान करून त्यांना विदूषकाचे कपडे घालायला लावले आणि मृत्यूपूर्वी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. पंधरवड्यापेक्षा जास्त दिवस त्यांना मरण यातना दिल्या, त्यांचे डोळे फोडले, जीभ कापली, नखे काढले, इतक्यावरही न थांबलेल्या औरंजेबाने त्वचाही सोलली. शेवटी 11 मार्च 1689 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी संभाजी महाराजांवर वाघ नखाने वार करण्यात आला  आणि भीमा नदीच्या काठावर तुळापूर येथे कुऱ्हाडीने शिरच्छेद करून ठार मारण्यात आले. पुण्याजवळनंतर, संभाजीचे तुकडे केलेले अवशेष नंतर वडूच्या काही लोकांनी एकत्र केले आणि शेवटी योग्य विधी आणि सन्मानाने अंत्यसंस्कार केले. असे म्हटले जाते की क्रूर छळ करूनही, संभाजीने एकदाही सम्राट औरंगजेबाकडे दयेची याचना केली नाही आणि औरंगजेबाने विचारलेल्या कोणत्याही गोष्टीचे उत्तर देण्यास नकार दिला. छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या बलिदानाचे स्मरण छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस म्हणून पाळला जातो.