Champa Shashti 2020 Wishes and Messages in Marathi: मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीचा दिवस चंपाषष्ठी (Champa Shashti) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात जेजुरी मध्ये प्रतिपदेपासून सुरू झालेल्या उत्सवाची आणि खंडोबा नवरात्रीची आजच्या चंपाषष्ठी दिवशी सांगता केली जाते. खंडोबाने मणी आणि मल्ल यांच्या जाचातून लोकांना मुक्त केल्याने त्याच्या स्मरणार्थ चंपाषष्ठी दिवशी भगवान शंकर आणि त्यांच्या रूपातील खंडोबाची पूजा केली जाते. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर यात्रा जरी रद्द झाली असली तरीही चंपाषष्ठीच्या शुभेच्छा (Champa Shashti Shubhechha) तुम्ही नातेवाईल, मित्रमंडळी, प्रियजण आणि खंडोबाच्या भक्तांना सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook) द्वारा मराठी संदेश, शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स यांच्यामाध्यमातून पाठवू शकतो. मग आजच्या चंपाषष्ठीचा आनंद द्विगुणित करून खंडोबा नवरात्रीची सांगता करा. Khandoba Navratri 2020: खंडोबा नवरात्री यंदा 15 डिसेंबर पासून; जाणून घ्या देवदीपावली, चंपाषष्ठी कधी?
चंपाषष्ठीचा उत्सव हा राज्यात प्रामुख्याने जेजुरी, पाली, गुड- गुड्डापूर/ देवरह या ठिकाणी साजरा केला जातो. तसेच खंडोबा हे ज्याचं कुलदैवत आहे त्यांच्याकडे हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
चंपाषष्ठीच्या शुभेच्छा
मणी व मल्ल या दानवांसोबत भगवान शंकराने खंडोबाचे/ मार्तंड भैरवाचे रूप घेऊन 6 दिवस युद्ध केले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याचा खात्मा केला. त्यावेळी मणी राक्षसाने शरण येऊन 'माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहूदे', अशी इच्छा व्यक्त केली. ती मान्य देखील झाली. तर मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला. माझे नाव तुमच्या नावाआधी जोडले जावे, अशी मागणी केली. त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसास आशिर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड, असे म्हटले जाऊ लागले.