
वसंत ऋतूची सुरुवात ज्या दिवसापासून होते त्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत चैत्र नवरात्री साजरी केली जाते. याच दिवशी गुढीपाडवा या सणाने नववर्षाची सुरुवात केली जाते. नऊ दिवसांचा हा चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) उत्सव रामनवमी पर्यंत असतो. असे म्हणतात चैत्र नवरात्र पूजनाने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक गोष्टी निर्माण होतात. तसेच घरात सुख-शांति, समृद्धी, संपत्ती टिकून राहावी यासाठी चैत्र नवरात्री साजरी केली जाते. वर्षातून 4 नवरात्री येतात. त्यात चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र, यांच्यासोबतच आषाढ आणि माघ महिन्यात गुप्त नवरात्र साजरी केली जाते.
हिंदू भाविक नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी मां शैलपुत्री, दुसर्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसर्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्रि, आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्रि देवीच्या रूपाची आराधना केली जाते. ही सर्व दुर्गा मातेची रुपं असून या प्रत्येक रुपातील देवीला विशेष पद्धतीचा नैवेद्य अर्पण केला जातो.
काय असावा या 9 देवींचा नैवेद्य
1. शैलपुत्री
शैलपुत्री देवीला पांढ-या रंगाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी मातेच्या बालिका अवताराची पूजा केली जाते. या दिवशी देवीचे भक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करुन देवाला तूपाचा नैवेद्य चढवतात.
2. ब्रह्मचारिणी
या देवीला भक्त साखरेचा नैवेद्य दाखवतात. भक्त हिरव्या रंगाचे वस्त्र घालून मातेला साखरेचा नैवेद्य दाखवतात. Chaitra Navratri 2020 Dates: यंदा 25 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान चैत्र नवरात्र; इथे पहा तिथीनुसार तारखा
3. चंद्रघंटा
या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ मातेला वाहिले जातात. असे केल्याने देवी प्रसन्न भक्ताचे सर्व दु:ख करते असे सांगितले जाते. Chaitra Navratri 2020 Messages: चैत्र नवरात्री च्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Wishes, WhatsApp Status, Images च्या माध्यमातून देऊन भक्तिमय वातावरणात साजरा करा हा नऊ दिवसांचा उत्सव
4. कुष्मांडा
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते. या दिवशी मातेला मालपोहयाचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी भक्त नारिंगी रंगाचे वस्त्र घालून मातेला मालपोह्याचा नैवेद्य चढवितात.
5. स्कंदमाता
या दिवशी भक्त पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करुन मातेला केळीचा नैवेद्य अर्पण करतात. हा नैवेद्य देवीला दाखविल्यानंतर हा प्रसाद ब्राह्मणांना दान केला जातो.
6. कात्यायनी
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी भक्त लाल रंगाचे वस्त्र परिधान करुन मातेला मधाचा नैवेद्य दाखवतात. यामुळे भक्ताला सुंदर रुप सुद्धा प्राप्त होऊ शकते.
7. कालरात्री
या दिवशी भक्त निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करुन मातेला गूळाचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर तो नैवेद्य ब्राह्मणांना दान केला जातो.
8. महागौरी
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी भक्त गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करुन देवीला नारळ अर्पण करतात. त्यानंतर हा नारळला हळद-कुंकू वाहत्या पाण्यात अर्पण करावा.
9. सिद्धिदात्री
चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या म्हणजेच नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. या दिवशी गडद रंगाचे कपडे घालून मातेचा पंचपक्वानाचा नैवेद्य दाखविला जातो. पूरी, चन्याची भाजी, खीर बनवून हा नैवेद्य गरिबांत दान करतात. या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य देखील दाखवला जातो.
चैत्र नवरात्रीत सलग 9 दिवस अशा पद्धतीने भोग चढविल्याने देवी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्यावर येणारी संकटे दूर करेल अशी भक्तांची श्रद्धा आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )