
Chaitra Navratri Marathi Messages: होळीच्या सणानंतर येणारी चैत्र नवरात्र ही वसंत ऋतूमध्ये येते. या नवरात्रीला वासंती नवरात्र असेही म्हणतात. चैत्र नवरात्राची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या काळात चैत्र नवरात्र साजरे केले जाते. यंदा ही चैत्र नवरात्र 25 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात. चैत्र महिन्यात पहिली चैत्र नवरात्र साजरे केले जाते. दुसरी नवरात्र जून-जुलै महिन्यात, तिसरे सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत, तर चौथी नवरात्र जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात साजरे केले जाते.
यातील वर्षातील पहिली चैत्र नवरात्र ही गुढीपाडव्याला येते. त्यामुळे चैत्र नवरात्रीसह आपण नववर्षाचेही मोठ्या आनंदात आणि उत्साहात स्वागत करतो. अशा या मंगलमयी वातारणात आपल्या आप्तलगांना द्या चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा:
या मंगलदिनी सर्वांनी मिळून
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
चैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा

हेदेखील वाचा- Chaitra Navratri 2019 Recipe: चैत्र नवरात्र दरम्यान आंबेडाळ आणि कैरीचं पन्ह घरच्या घरी कसं बनवाल (Watch Video)
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटूंबावर सदैव राहो हिच प्रार्थना
चैत्र नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

माँ दुर्गा आली तुमच्या दारी करुनी सोळा श्रृंगार
तुमची जीवनात कधीही न होवो हार
सदैव सुखात राहो तुमचा परिवार
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहू दे
तुमच्या स्वप्नांना नवी भरारी मिळू दे
नवरात्रीच्या या पावन प्रसंगी
आई जगदंबेचा कृपाशिर्वाद तुम्हांस मिळू दे
चैत्र नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा

हिंदू भाविक नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी मां शैलपुत्री, दुसर्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसर्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्रि, आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्रि देवीच्या रूपाची आराधना केली जाते. चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच राम नवमी या दिवशी नवरात्र समाप्त होईल.