Buddha Jayanti 2019: बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून साजरी केली जाते. यंदा 18 मे दिवशी जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध (Gautama Buddha) यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण झाल्याने बौद्ध धर्मीयांमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व असते. सार्या संसारिक सुखाचा त्याग करून सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्ध यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं. मग यंदाच्या बुद्ध जयंतीच्या दिवशी जाणून घ्या राजकुमार सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास नेमका कसा झाला? Buddha Purnima 2019 Wishes & Messages: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा Greetings, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं!
गौतम बुद्ध यांच्या आयुष्याबद्दल काही रोचक गोष्टी
- गौतम बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ होते. मात्र त्यांच्या जन्मदात्या आईचं निधन झाल्यानंतर महाप्रजापती गौतमी यांनी केल्याने त्यांचं नाव 'गौतम' असं झाले. पुढे त्यांचा एका राजकुमारीची विवाह झाला आणि त्यांना 'राहुल' नावाचा मुलगा होता.
- बुद्ध हे नाव नसून ही उपाधी आहे. त्याचा अर्थ आभाळाएव्हढ ज्ञान असा होतो.
- आशिया खंडामध्ये सुमारे निम्मी लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे.
- जगातील पहिल्या 100 महामानवांमध्ये गौतम बुद्ध यांचं स्थान अव्वल आहे.
- सुखवस्तू जीवन जगणार्या गौतम बुद्ध यांनी समाजातील दु:ख, कष्ट, हालाखीची परिस्थिती पाहिल्यानंतर संसाराचा, राजधर्माचा त्याग करून आत्मशोध घेण्यासाठी संन्यास स्वीकारला.
- बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती झाली असं सांगितले जाते. हा दिवस वैशाख पौर्णिमेचा होता.
- बुद्ध धर्माची दीक्षा पुढे अनेक शिष्यांनी घेतली. नेपाळ आणि भारत देशापलिकडेही आशिया खंडात बौद्ध धर्माचा प्रसार झाला.
- गौतम बुद्धांनी चार आर्यसत्य,अष्टांग मार्ग आणि पंचशीलं सांगितली आहेत. बुद्ध धर्माची शिकवण आणि आचरण यावरच अवलंबून आहे.
- वयाच्या 80व्या वर्षी गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले.
गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमेदिवशी साजरी करतात.गौतम बुद्ध हे विष्णूचे 9 वे अवतार आहेत असादेखील समज आहे. त्यामुळे हिंदू धर्मीयदेखील यादिवशी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात.