
Buddha Jayanti 2019 Marathi Wishes: धम्माचा प्रचार करणारे भगवान गौतम बुद्ध (Gautama Buddha) यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima). यंदा 18 मे रोजी जगभरात बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या उत्साहात बुद्ध जयंती साजरी करणार आहेत. केवळ भारतातातच नव्हे तर श्रीलंका (Sri Lanka), नेपाळ (Nepal) , तिबेट (Tibet), भूतान (Bhutan) आणि बांगलादेश (Bangladesh) सह जगभरात पसरलेल्या बौद्ध अनुयायांसाठी हा दिवस पवित्र मानला जातो. या दिवशी पगोड्यात जाऊन आशीर्वाद घेणे , दान करणे, समाजसेवेची कामं करणे या मार्गे आनंद साजरा करण्याची पद्धत आहे. मग यंदा बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Quotes, Wishes, Images व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र. Buddha Purnima 2019: 502 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमा दिवशी जुळून आलाय 'हा' दुर्मिळ योग!
बुद्ध जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
-जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी स्वत:चे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला.वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

-बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा, हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

-बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

-एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते तसाच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो
धम्मप्रसारक महान भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

-तीन गोष्टी जपासून कधीच लपु शकत नाहीत, सूर्य चंद्र आणि सत्य
सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांच्या जयंतीच्या शुभेच्छा

बुद्ध जयंती GIFs
भगवान बुद्ध म्हणजेच सिद्धार्थ हे एका श्रीमंत किंबहुना राजघराण्यातील सदस्य असूनही मनःशांतीसाठी सांसारिक सुखाचा त्याग करून रानावनात राहिले होते, असं म्हणतात, गौतमांच्या जन्मापासून ते मोक्ष प्राप्ती पर्यंत सर्व महत्वाच्या घटना या पौर्णिमेच्या दिवशीच घडलेल्या आहेत, त्यामुळे या दिवसाला बौद्ध अनुयायांमध्ये खास महत्व आहे.